स्मार्ट बुलेटिन | 11 एप्रिल 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज चर्चा करणार, देशातील लॉकडाऊनसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता, लॉकडाऊन वाढणार की संपणार याबाबत उत्सुकता
2. लॉकडाऊन हटवण्यात घाई केली तर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होईल, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा इशारा, सावधपणे निर्बंध शिथिल करण्याचाही सल्ला
3. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्या 1500 च्या पार, दिवसभरात 210 नव्या रुग्णांची नोंद, तर मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा अकराशेच्या वर
4. जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरुच, रुग्णांचा आकडा 17 लाखांवर, तर शंभर दिवसात एक लाखांपेक्षा जास्त बळी, अमेरिकेत सर्वाधिक 5 लाख रुग्ण
5. लॉकडाऊनमध्ये आमदार अनिल भोसले यांच्या भावाचा मुंबई-पुणे प्रवास, मावळच्या प्रांताधिकाऱ्यांनी सहीचे पत्र दिल्याचा दावा, प्रांताधिकाऱ्यांनी मात्र दावा फेटाळला
6. मुंब्र्यात कोरोनाच्या तपासणीसाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाच धक्काबुक्की, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
7. सक्षम असलेल्या सहकारी बँका, साखर कारखाने, दूध संघांना सरकारी रुग्णालये चालवण्याची परवानगी द्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांची सूचना
8. दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द होऊन विद्यार्थ्यांना सरासरी गुण मिळण्याची शक्यता, 14 एप्रिलनंतर पेपरसंदर्भात निर्णय घेणार, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
9. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोटक महिंद्रा बँकेचे संचालक उदय कोटक यंदा केवळ एक रुपया पगार घेणार, पीएम केअर्समध्ये 25 कोटींची मदत करणार
10. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियेतची अमेरिकेलाही भुरळ, व्हाईट हाऊसच्या ट्विटर हॅण्डलवरुन फॉलो होणारे नरेंद्र मोदी जगातील एकमेव राजकीय नेते























