स्मार्ट बुलेटिन | 10 ऑक्टोबर 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्या, मराठा संघटनांच्या विरोधानंतर राज्य सरकारचा निर्णय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा आणि दुय्यम सेवा परीक्षांचं काय होणार याबाबत प्रश्न
2. इंजिनीअरिंग, फार्मसी आणि इतर व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या पात्रतेच्या निकषांमध्ये शिथिलता, बारावीच्या किमान गुणांची अट आता पाच टक्क्यांनी कमी
3. तांत्रिक गोंधळामुळे काल न झालेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पुन्हा घेणार, नागपूर विद्यापीठाची माहिती, लवकरच वेळापत्रक जाहीर करणार
4. ओबीसी आणि धनगर समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणार, विजय वडेट्टीवार यांची माहिती, 16 ऑक्टोबरचं आंदोलन धनगर समाजाकडून स्थगित
5. रिपब्लिक टीव्हीच्या मुख्य वित्त अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांकडून समन्स, टीआरपी घोटाळ्याची चौकशी होण्याची शक्यता
6. कोरोनाने उमदा अधिकारी हिरावला, परभणीचे सुपुत्र आणि त्रिपुरा केडरचे अधिकारी सुधाकर शिंदे यांचं वयाच्या 34 व्या वर्षी निधन, पुण्यातील रुबी हॉलमध्ये उपचारादरम्यान अखरेचा श्वास
7. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, पाटण्यातील दीघा घाट इथे अखेरचा निरोप देणार
8. कर्नाटकातील न्यायालयाचा अभिनेत्री कंगना रनौत विरोधात एफआयआर नोंदवण्याचा आदेश, कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप
9. दिल्ली कॅपिटल्सची राजस्थान रॉयल्सवर 46 धावांनी मात, आज वीकेण्डचा सुपर थरार, दुपारी पंजाब-कोलकाता तर संध्याकाळी धोनी आणि विराटचा संघ भिडणार
10. सर्बियाचा नोवाक ज्योकोविच पाचव्यांदा फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये, चुरशीच्या सामन्यात ग्रीसच्या त्सिसिपासवर मात, विजेतेपदासाठी ज्योकोविच आणि नदाल यांच्यात लढत