एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 07 ऑक्टोबर 2020 | बुधवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- बिहार विधानसभेसाठी शिवसेना 50 उमेदवार रिंगणात उतरवणार, महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडे यांना टक्कर देण्याचा निर्धार
- आमचं सरकार असतं तर चीनी सैन्याला 15 मिनिटात बाहेर काढलं असतं; भारत-चीन सीमा वादावरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
- मराठा नेत्यांमधले मतभेद मिटवण्यासाठी नवी मुंबईत आज मेगा बैठकीचं आयोजन, संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्या उपस्थितीत EWSच्या लाभावर खलबतं होणार
- मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर अटॅक, डिस्टन्स आणि लर्निंगच्या परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचा संताप; सोलापूर विद्यापीठाच्या वेबसाईटमध्येसुद्धा बिघाड
- राज्यात कोरोनाची लाट ओसरतेय, गेल्या आठ दिवसांत रुग्णसंख्येत मोठी घट; गाफिल न राहण्याचं आरोग्य मंत्र्यांचं आवाहन
- बीडमध्ये 7.4 टक्के लोकांमध्ये कोरोना अँटिबॉडीज, तर जळगावात हे प्रमाण सर्वाधिक 25 टक्के; सिरो सर्व्हेचा अहवाल
- राज्यभरातील ग्रंथालय उघडण्याची सर्वस्तरातून मागणी, खासदार सुप्रिय सुळे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा; सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
- राज्यात कापूस नोंदणी प्रक्रिया सुरु; लांब धाग्याच्या कापसाला प्रती क्विंटल 5825 असा हमीभाव मिळणार
- केंद्र सरकारच्या कृषी कायद्यातील उणीवा दूर करणे गरजेचे; शेतकरी हितासाठी सर्वांनी एकत्र यावे, शेतकरी संघटनांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
- मुंबई इंडियन्सचा विजयाचा चौकार, मुंबईकडून राजस्थानचा 57 धावांनी पराभव; पॉईंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्स अव्वल स्थानी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement