एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 4 मार्च 2020 | बुधवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. भारतात 6 जणांना कोरोनाची लागण, उपाय योजनांसाठी आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची बैठक, तर मुंबईत N95 मास्कचा तुटवडा
2. सोशल मीडिया सोडण्यासंदर्भात नरेंद्र मोदींनी केलेल्या ट्वीटचा सस्पेन्स संपला, रविवारी महिला सांभाळणार पंतप्रधानांचे सोशल मीडिया अकाऊंटस, सामनाच्या अग्रलेखातून टीका
3. मुस्लिम आरक्षणासंदर्भात शिवसेनेची भूमिका ठरलीच नाही, मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणामुळं सरकारमधले मतभेद चव्हाट्यावर, नवाब मलिकांनी केली होती अध्यादेश काढण्याची घोषणा
4. मराठीजनांच्या दणक्यानंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या टीमकडून माफीनामा, मुंबईची भाषा हिंदी असल्याच्या संवादावरुन मालिकेवर चौफेर टीका
5. रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना लवकरच गणवेश, अन्न आणि मानके सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर, महिन्यातून प्रत्येक डेअरीची किमान एकदा तपासणी
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 04 मार्च 2020 | बुधवार | ABP Majha
6. उमर खालीदच्या अमरावतीतल्या चिथावणीखोर भाषणाचा व्हिडीओ व्हायरल, व्हिडीओ तपासून कारवाई करू, टीकेनंतर पोलिसांचं स्पष्टीकरण 7. पुण्यात 4 कोटी खर्चून बांधलेले 7 हजार बेंच कागदावरच, बेंचबाबत अधिकाऱ्यांनाही माहिती नाही, सर्वपक्षीय नगरसेवकांनी बांधलेल्या बेंचवर प्रश्नचिन्ह 8. मुंबईत लवकरच होर्डिंग पॉलिसी, होर्डिंग्समुळे झालेल्या वृक्षतोडीवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंची माहिती, औरंगाबादेत अवैध होर्डिंग्स काढण्याचे कोर्टाचे आदेश 9. ठाण्यात 30 हजार घरं उभारणार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची माहिती, मुंबई महानगर क्षेत्राचा ठाणे, विरारपर्यंत विस्तार करणार 10. कल्याण-डोंबिवलीच्या पत्री पुलावर भाजपचं आंदोलन, फेब्रुवारीतलं काम अद्यापही पूर्ण न झाल्यानं आक्रमक, तर भाजपचं आंदोलन नौटंकी असल्याची सेनेची टीकाएबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement