एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्ट बुलेटिन | 22 ऑगस्ट 2019 | गुरुवार | एबीपी माझ
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
-
- पी. चिदंबरम यांची रात्रभर कसून चौकशी, डझनभर प्रश्नांची सरबत्ती, आज सीबीआय कोर्टासमोर हजर करणार
- सकाळी साडेदहा वाजता राज ठाकरे ईडीसमोर हजर होणार, पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त, राज ठाकरेंकडून शांततेचं आवाहन, मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीस
- आजपासून महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, धुळे-नंदुबराबारमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा, विधानसभेच्या निवडणुकीची तयारी
- नेत्यांना बदनाम करण्यासाठी एजन्सी कार्यरत, राज ठाकरेंच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर राणेंचा गौप्यस्फोट, भाजपबाबत 10 दिवसांत निर्णय घेणार
- महाराष्ट्र काँग्रेसकडून प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांना बदलण्याची हायकमांडकडे मागणी, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर
- वंचित आणि एमआयएममधील जागावाटपाचा तिढा सुटणार, प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांच्यात 26 ऑगस्टला हैदराबादमध्ये बैठक
- भाजपसोबत राहायचं की नाही 10 दिवसात ठरवणार, एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा कार्यक्रमात खासदार नारायण राणे यांचं स्पष्टीकरण
- अमित शाहांसोबतच्या भेटीमुळे नाना पाटेकरांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा, सिनेक्षेत्रासह राजकीय पटलावर चर्चेला ऊत
- नालासोपाऱ्यात दीड कोटींचं कोकेन जप्त, नायजेरियन तरुणाला अटक, एकजण फरार, पालघर एटीएस विभागाची कारवाई
- विंडीजविरुद्धच्या अँटिग्वा कसोटीत टीम इंडिया नव्या जर्सीमध्ये उतरणार, भारतीय शिलेदार कसोटी इतिहासात पहिल्यांदाच नंबर असलेली जर्सी परिधान करणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
बुलढाणा
क्रिकेट
Advertisement