स्मार्ट बुलेटिन | 21 डिसेंबर 2019 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याविरोधातल्या हिंसक आंदोलनात यूपीत 6 जणांचा मृत्यू, 50 पोलीस जखमी, ठिकठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक
2. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तपासणार, चांगलं काम करणाऱ्यांना प्रमोशन तर असमानधाकारक काम करणाऱ्यांना डच्चू मिळण्याची शक्यता
3. अटल बिहारी वाजपेयी असते, तर भाजपला राजधर्माची आठवण करुन दिली असती, ममता बॅनर्जींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल
4. झारखंडमध्ये भाजपला दणका तर काँग्रेस आघाडीला फायदा होण्याची शक्यता, एबीपी न्यूज-सी व्होटरच्या सर्व्हे, सोमवारी झारखंड विधानसभेचा निकाल
5. महाराष्ट्रातही मुस्लीम समाज रस्त्यावर, पुणे, औरंगाबाद, भिवंडीत मोठे मोर्चे, तर बीड, हिंगोली, परभणीत आंदोलनाला हिंसक वळण, मुख्यमंत्र्यांचं शांततेचं आवाहन
6. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, विरोधक आजही शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन आंदोलन करण्याची शक्यता
7. सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना पूर्णपणे क्लीनचिट, एसीबीच्या शपथपत्रावर फडणवीसांचा तीव्र आक्षेप, तर अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाचे संजय राऊतांकडून संकेत
8. फक्त मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंची काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी, नारायण राणेंचा हल्लाबोल, राष्ट्रवादी टॅक्स फ्री असल्याचं म्हणत शरद पवारांवर टीकास्त्र
9. पूरग्रस्तांना मदत मिळण्यासाठी कोल्हापुरातील महिलांनी पुणे-बंगळुरू महामार्ग अडवला, महामार्गावरच संसार मांडत आंदोलन, पोलिसांकडून धरपकड
10. पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणावरील हार आता भाविकांच्या गळ्यात, मंदिर समितीकडून निर्माल्यावर तोडगा