Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 13 एप्रिल 2021 मंगळवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन |13 एप्रिल 2021 मंगळवार | ABP Majha
1. सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत साधेपणानं गुढीपाडवा साजरा करा, नियमावली जाहीर, आरोग्याची गुढी उभाऱण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन
2. रमजान, इफ्तारसाठी गर्दी न करता घऱीच नमाज पठण करा, सरकारकडून नियमावली प्रसिद्ध, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन
3. लॉकडाऊनसंदर्भात सरकारचा निर्णय झाल्याचे आरोग्यमंत्र्यांकडून संकेत, 15 ते 30 एप्रिलदरम्यान राज्यभर कडक लॉकडाऊनची शक्यता
4. राज्यात काल 51,751 नव्या कोरोनाबाधितांची वाढ तर 52,312 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज
5. मुंबईत काल नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त, मात्र पुण्यात बिकट परिस्थिती, मृत्यूंचा आकडा वाढला
6. कुठल्याच रुग्णालयात बेड न मिळाल्यानं शिर्डीतल्या रुग्णानं दारावरच सोडले प्राण, तर नालासोपाऱ्यात एकाच रुग्णालयात 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू
7. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, कोरोनासंबंधित औषधं आणि वैद्यकीय उपकरणांवरचा जीएसटी कमी करण्याची मागणी
8. एनआयए प्रमुखांची तडकाफडकी बदली का केली? हसन मुश्रिफ यांचा सवाल, चौकशीची मागणी
9. रोमहर्षक सामन्यात पंजाबकडून राजस्थान रॉयलचा पराभव, शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावर उभ्या राहिलेल्या संजू सॅमसनची शतकी खेळी व्यर्थ
10. INS Virat चं संग्रहालय बनवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, तोडकामावरील बंदी हटवली