एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 02 ऑगस्ट 2019 | शुक्रवार | ABP Majha
दिवसभरात महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
- राज ठाकरे ईडीच्या रडारवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा, कोहीनूर मिलचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात
- ईव्हीएमबाबत भूमिका घेण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची आज पत्रकार परिषद, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार
- महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचं मिशन विधानसभा सुरु तर शिवसेनेसाठी आजपासून बांदेकर भावोजींचा माऊली संवाद
- राष्ट्रवादी सोडणाऱ्यांचं हृदय तपासावं लागेल, गयारामांना शरद पवारांचा टोला, तर कुरघोड्या थांबल्या नाहीत म्हणून पक्ष सोडल्याचा शिवेंद्रराजेंचा पलटवार
- शिवसेनेकडून पक्षात येण्यासाठी आतापर्यंत 25 फोन, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
- मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात माझ्या विरोधातील आरोपपत्र अवैध, आरोपी प्रसाद पुरोहितांचा हायकोर्टात दावा
- राज्यभरात पावसाची संततधार, राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे उघडले, हतनूर धरणाच्या 36 दरवाजांमधून विसर्ग सुरु, नाशिक, चंद्रपुरातील धरणांमध्येही पाणीसाठा वाढला
- बेळगावात देशातील पहिली महिला सैन्य भरती, तीन हजारांपेक्षा जास्त तरुणींचा सहभाग
- पाकिस्तानच्या ताब्यातील कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासाची मदत मिळणार, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालानंतर पाकिस्तानचा निर्णय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement