एक्स्प्लोर
नोटाबंदी सर्व्हे: राज्यभरातील बलुतेदारांचं मत काय?
मुंबई: ‘एबीपी माझा’च्या नोटाबंदीच्या ऑनलाइन सर्व्हेप्रमाणेच राज्यभरातील बलुतदारांचंही मत आम्ही जाणून घेतलं. ग्रामीण भागामध्ये ज्या लोकांकडे इंटरनेट उपलब्ध नाही अशा लोकांशी आमच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून थेट संवाद साधण्यात आला. ऑनलाईन सर्व्हेप्रमाणेच ग्राऊंड झिरो सर्व्हेही करण्यात आला. या सर्व्हेमध्ये 400 जणांनी सहभाग घेतला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाला 50 दिवस पूर्ण झाले आहेत. ही मुदत संपल्यानंतरची परिस्थिती काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘एबीपी माझा’ने या सर्व्हेच्या माध्यमातून केला.
यासाठीच सहा प्रश्नांच्या माध्यमातून ‘माझा’ने जनतेची मतं जाणून घेतली. त्या प्रश्नांचा सविस्तार आढावा –
1. 50 दिवसाच्या मुदतीनंतर नोटाबंदीचा हेतू साध्य झालाय असं वाटतं का?
होय - 51%
नाही - 49%
2. नोटाबंदीच्या 50 दिवसांमध्ये अपेक्षित काळा पैसा बाहेर आला असं वाटतं का?
होय - 40 %
नाही - 60 %
3. 50 दिवसांनंतरही सर्वसामान्य लोकांना येणाऱ्या अडचणी कमी झाल्यात का?
होय - 32 %
नाही - 68 %
4. कॅशलेस व्यवहारासाठी आपण पुरेसे तंत्रसज्ज आहोत का?
होय - 18 %
नाही - 82 %
5. नोटाबंदीचा फटका राजकारण्यांना बसला असं वाटतं?
होय - 56 %
नाही - 44 %
6. नोटाबंदीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील विश्वास वाढला की घटला?
वाढला - 72 %
घटला - 28 %
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement