एक्स्प्लोर

'अभी तो मैं जवान हूं,' शरद पवारांच्या वक्तव्यानंतर सभेत एकच हशा

शरद पवारांनी सभेत सरकारवर निशाणा साधलाच, पण वयावरुन टिप्पणी केलेल्या मंचावरील के पी पाटील, ए वाय पाटील आणि सतेज पाटील यांनाही कोपरखळी मारली.

कोल्हापूर : राज्यातून शिवसेना-भाजपचं सरकार घालवण्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी "अभी तो मैं जवान हूं." चिंता करण्याचं कारण नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार केलं आणि सभेत एकच हशा पिकला. ईडी आणि अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या प्रकरणानंतर शरद पवार यांनी पहिलीच काल (4 ऑक्टोबर) सभा कोल्हापुरात घेतली. राधानगरी-भुदरगड मतदारसंघातील उमेदवार के पी पाटील यांच्यासाठी सभा घेताना त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शरद पवारांनी सभेत सरकारवर निशाणा साधलाच, पण वयावरुन टिप्पणी केलेल्या मंचावरील नेत्यांनाही कोपरखळी मारली. शरद पवार म्हणाले की, "ए वाय पाटील असो, के पी पाटील असो, सतेज पाटील असो ही सगळी मंडळी मनापासून कामाला लागली आहेत. त्याचा मला आनंद आहे. पण त्यांची एक गोष्ट मला आवडली नाही. तिघांनाही सांगतो असं बोलू नका. त्यांनी सांगितलं, 80 वर्षांचा माणूस, आता मी काय म्हातारा झालोय? या राज्यातून शिवसेना-भाजपचं सरकार घालवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी अभी तो मैं जवान हूं. चिंता करण्याचं कारण नाही." शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर सभेत हास्यकल्लोळ झाला. दरम्यान, राज्यातील जनतेने मला 14 वेळा निवडून दिलं. सात वेळा विधानसभा, सात वेळा लोकसभेत निवडून गेलो. चार वेळा मुख्यमंत्री केलं. देशाचा कृषीमंत्री, संरक्षणमंत्री केलं.  महाराष्ट्राने मला खूप दिलं आहे. आता चुकीच्या लोकांच्या हातात गेलेला महाराष्ट्र पुन्हा योग्य माणसांच्या हातात देण्यासाठी माझी धडपड सुरु आहे, असंही पवार म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Embed widget