एक्स्प्लोर
आठवणीतील वारी..वारीच्या आठवणी..आज तुकोबांची पालखी बारामती मध्ये विसावली असती..
कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. तुकोबांच्या पादुका या देहूत तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत. आपण केवळ प्रवासाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.
प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती तर आज माऊलींच्या पालखीचा लोणंद मध्येच दुसरा मुक्काम झाला असता आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज कविवर्य मोरोपंतांच्या बारामती शहरात प्रवेश केला असता.
तुकारामांची पालखी आज बारामती नगरी मध्ये दाखल झाली असती..
प्रथेप्रमाणे वारी निघाली असती तर आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा हा कविवर्य मोरोपंत पारडकरांच्या व शिवालीलामृताचे रचनाकार श्रीधर स्वामी यांच्या कर्मभूमी मध्ये म्हणजे बारामती शहरामध्ये पोहोचला असता. वळणदार रोटी घाट काल पार केल्यानंतर वारकरी काल गवळ्याची उडवंडी मध्ये विसावले असते. सकाळी लवकरच उडवडी वरून बारामती साठी तुकोबांच्या पालखीने प्रस्थान ठेवले असते. पालखी सोहळा उडवंडी पठारला येताच परिसरातील लोक पादुकांचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी करत असायचे.
रस्त्यामध्ये बऱ्हाणपूर.. मोरेवाडी याही परिसरामध्ये पालखीचे दर्शन घेण्यासाठी आबालवृद्ध रस्त्याच्या दुतर्फा सकाळपासूनच गर्दी करत असायचे.. बारामती नगरीमध्ये पालखीने प्रवेश करतात पालखीच्या समोर रांगोळीच्या पायघड्या टाकलेल्या असायच्या. बारामती शहरामध्ये उंचच्या उंच कमानी टाकून पालखीचे जंगी स्वागत झाले असते. पालखी येण्यापूर्वीच वारकरी बारामती शहरांमध्ये पोहोचायला सुरुवात केलीली असायची. शहरात आले की सिद्धेश्वर मंदिर..श्री राम मंदिर.. विठ्ठल रुक्मिणी मंदिर या परिसरामध्ये वारकरी विसवायचे..
प्रथे प्रमाणे वारी निघाली असती तर आजचा मुक्काम तुकोबांच्या पालखीचा बारामती शहरांमध्ये झाला असता.. आणि उद्या काठेवाडी मध्ये मेंढ्यांच गोल रिंगण सुद्धा पार पडले असते..
प्रथेप्रमाणे वारी निघाली असती तर आज माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये स्थिरावला असता.. नीरा स्नान झाल्यानंतर लोणंद मुक्कामी आलेल्या पालखीचा आजचा दुसरा मुक्काम सुद्धा लोकं मध्येच राहिला असता आज आमवास्या आल्यामुळे दरवर्षी लोकांमध्ये एक मुक्काम व्हायचा मात्र आता दुसरा मुक्काम सुद्धा वाढला असता..
पालखी सोहळ्यातील दिनक्रम.. मुक्कामाचे ठिकाण वेळ.. सगळं सुनिश्चित झालेले असते..मात्र लोणंद मध्ये कोणत्या वर्षी वारीचे किती मुक्काम असतात हे तिथी वर ठरवण्याची प्रथा आहे..म्हणूनच लोणंद मध्ये कोणत्या वर्षी पालखीचा मुक्काम दीड दिवसाचा असतो तर कोणत्या वर्षी तोच मुक्काम अडीच दिवसाचा देखील करण्याची प्रथा आहे.. एरवी इतर ठिकाणी पालखी मार्गात पालखीचे प्रस्थान हे सकाळी लवकर केले जायचे मात्र लोणंद मुक्कामी मात्र लोणंद मुक्कामी असलेली पालखी ही उध्या दुपारी मध्यन्ह आरती झाल्यावर तरडगाव साठी प्रस्थान ठेवल असते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement