एक्स्प्लोर
आदिती तटकरेंच्या गटातून शिवसेनेसह 5 उमेदवारांची माघार
रायगड : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची कन्या आदिती तटकरे विरोधातील 5 उमेदवारांनी निवडणुकीपूर्वीच माघार घेतली आहे. रोहा जिल्हा परिषद गटातून त्या निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर आता फक्त भाजप उमेदवार आणि एका अपक्षाचं आव्हान असेल.
माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचाही समावेश आहे. या गटातून आदिती तटकरेंना बिनविरोध निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी अगोदरच प्रयत्न केले होते. मात्र बिनविरोध निवड झाली नसली, तरी आव्हान आता अधिक सोपं झालं आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीतून आदिती तटकरेंनी राजकारणात पाऊल ठेवलं आहे. रोहा तालुक्यातील वरसे जिल्हा परिषद गटातून त्या निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे सुनील तटकरेंसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक असेल.
संबंधित बातम्या :
सुनील तटकरेंची कन्या आदिती तटकरे जिल्हा परिषदेच्या रिंगणात
झेडपीचा रणसंग्राम : सुनील तटकरेंची कन्या आदिती तटकरेंची मुलाखत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement