Jitendra Awhad: नव्याने 328 वाइन शॉपना परवाने दिले जाणार; जितेंद्र आव्हाडांचा संताप, म्हणाले, 'साधूसंतांचा महाराष्ट्र उद्या बेवड्यांचा महाराष्ट्र...'
Jitendra Awhad: 1974 साल बंद झालेलं परवाने आज पन्नास वर्षानंतर उघड झालं. इतकं बेशरम बेवड्यांचं दारुड्यांचं सरकार आहे. दारुड्यांची नवीन पिढी उभारण्याचं काम सरकार करतंंय असंही आव्हाड म्हणालेत.

मुंबई : गेली 50 वर्षे वाइन शॉप परवान्यांना राज्यात असलेली स्थगिती महसुलात वाढ करण्याच्या उद्देशाने उठवली जाणार असून, नव्याने 328 वाइन शॉपना परवाने दिले जाणार आहेत. महसूल वाढवण्याच्या धोरणाचा भाग म्हणून उत्पादन शुल्क विभागाच्या प्रत्येक प्रशासकीय विभागांमध्ये विदेशी मद्यनिर्मिती कंपन्यांना परवाना देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालीच समिती नेमण्यात आली आहे. मात्र, यामध्ये वादाची ठिणगीही पडली आहे. अजित पवार यांचे निकटवर्तीय व्यक्ती या व्यवसायाशी संबंधित असल्याच्या पार्श्वभूमीवर, हितसंबंधाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्वतःच्या प्रभावाखाली असलेल्या व्यक्तींना याचा फायदा मिळण्याची शक्यता असल्यामुळे काही सामाजिक संघटनांनी या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. दरम्यान या निर्णयवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हल्लाबोल केला आहे.
लाडक्या बहिणींचा संसार उध्वस्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला. 1974 मध्ये या राज्यात मद्यविक्रीचे परवाने रद्द केले होते. सत्तेची मस्तीमुळे मद्यधुंदाासाठी सरकारने परवाने उघड करायचे ठरवले आहे. अर्थव्यवस्थेचा खेळ खंडोबा होतोय. बहिणींचे पैसे द्यायचे आणि त्यांच्या नवऱ्यांना, बाबांना बेवडं आणि दारुडा करायचं, आठ विभाग आहेत. उत्पादन शुल्क विभागाचे हे परवाने आखले जाणार. एकेक कोटीला हे परवाने मिळणार. आत्ताच एका माजी मंत्राने परवानगी घेतला. महाराष्ट्रामध्ये जुनी दुकानांमध्ये दहा ते पंधरा कोटीने त्याशिवाय परवाने मिळत नव्हते. त्या 47 कंपन्यांना परवाने देण्याचा म्हणतात, त्या कोणाच्या मालकीच्या आहेत. हे सर्व मालक पहिलं मजल्यापासून वरपर्यंत बसले, त्यांचीच मुले ह्या कंपनीमध्ये डायरेक्टर आहेत. या 47 कंपन्या कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत. तुम्ही धंदा करा, तुम्ही धंद्यातून पैसा कमवा, तुम्हाला सत्तेची झिंग आहे, बहिणीला पैसे द्यायला नाहीत, कारण देऊन आर्थिक स्थिती सुधारायची असं म्हणून तुम्ही बहिणींचा संसार उध्वस्त करणार असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
दारू परवाना देणार असाल तर आम्हाला मान्य नाही. वारकऱ्यांचा आणि साधू संतांचा महाराष्ट्र की बेवड्यांचा महाराष्ट्र. सर्वात जास्त कंपन्या कोणाच्या आहेत. मज्जा देखो मज्जा या डायरेक्टर लोकांची नाव बाहेर पडतील. आम्हाला लोकांनी निवडून दिले 240 सदस्य आहेत. 240 सदस्यावर तुम्ही पाशवी बलात्कार करू शकत नाही. जो इतिहास महाराष्ट्राने यापूर्वी रचला तोच इतिहास महाराष्ट्र पुन्हा रचेल. तुमची सत्तेची झिंग झालेले डोळे पुन्हा उघडतील, असंही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी 'मुझको यारो माफ करना' गाणं गायलं, हे सरकार बेहक येड झालं आहे. मुझको यारो माफ करना मैं नशे में हुँ असं म्हणण्याची वेळ या सरकारवर आली आहे. ठाण्यातील येऊरमध्ये राष्ट्रीय उद्यान आहे, त्या ठिकाणी उत्पादन शुल्क लायसन कसे देतात. सर्वात जास्त येणारे पैसा तो म्हणजे उत्पादन शुल्क, 1974 साल बंद झालेलं परवाने आज पन्नास वर्षानंतर उघड झालं. इतकं बेशरम बेवड्यांचं दारुड्यांचा सरकार आहे. दारुड्यांची नवीन पिढी उभारण्याचं काम सरकार करते. पान टपरीवर याआधी ड्रग्स, कोकिंन, गांजा मिळत होता, आता चपटी मिळेल. आता चपट्या खिशामध्ये घेऊनच फिरण्याचे परवानगी द्या. आमच्या नळाला पाणी नाही आलं तरी चालेल पण तुमच्या घरात दारू मिळेल आम्हाला माज आहे, मत दिली सत्तेची तुमच्या घरात दारू पोहचवतो, असंही पुढे जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
ठाण्यात पाणी नाही, दारू प्या. विसरा पाणी आणि प्या दारू, एक-दोन-तीन पॅग मारा. पैसे कमवा पण पैसे वरती घेऊन जाणार का? आजही महाराष्ट्र आर आर पाटील यांना विसरले नाहीत. त्यांनी हित संबंध बाजूला करून आणि या राज्यामध्ये लेडीज बार बंदी केला. अनेकांचे घर संसार वाचवले. आता दारूचे कारखाने तुमचे, परवाने तुमचे, आणि देणारे तुम्हीच आहात. प्रत्येकाला एक बाटली पाठवावी लागणार. लुटा महाराष्ट्र पाजा दारू, साधुसंतांचा महाराष्ट्र उद्या बेवड्यांचा महाराष्ट्र होईल असा हल्लाबोल देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.


















