एक्स्प्लोर
नगरमध्ये लोकसंख्येपेक्षा 30 हजार जास्त आधार कार्डची नोंदणी
अहमदनगर : अहमदनगरमधील आधार कार्ड नोंदणीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. जिल्ह्यात लोकसंख्येपेक्षा तब्बल 30 हजार आधार कार्डची नोंदणी जास्त झाली आहे.
एकट्या शेवगाव तालुक्यात लोकसंख्येपेक्षा चार पट आधार कार्डची नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे. युआयडीच्या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध आहे.
2011 च्या जनगणनेनुसार शेवगावची लोकसंख्या 2 लाख 45 हजार 674 आहे. मात्र 9 लाख 97 हजार 446 आधार कार्डची नोंदणी झाली आहे. म्हणजेच लोकसंख्येच्या तुलनेत तब्बल 7 लाख 51 हजार 772 जास्त आधार कार्डची नोंद झाली आहे.
केंद्र सरकारानं सर्व योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचं केलं आहे. त्याचबरोबर ई-पेमेंटसाठी आधार कार्डचं लिंक करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र लोकसंख्येपेक्षा जास्त नोंदणी झाल्याने आधारच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement