एक्स्प्लोर
नांदेडच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना 2 लाख 80 हजाराचा गंडा
त्यांच्या क्रेडिट कार्डवरुन त्यांच्या परस्पर 2 लाख 80 हजार रुपयांचा व्यावहार झाला आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचीच फसवणूक झाल्याने खळबळ उडाली आहे.
नांदेड : नांदेड जिल्ह्याचे आतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांच्या क्रेडिट कार्डवरुन त्यांच्या परस्पर 2 लाख 80 हजार रुपयांचा व्यवहार झाला आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचीच फसवणूक झाल्याने खळबळ उडाली आहे.
खुशालसिंह परदेसी यांच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड आहे. मागील अनेक महिन्यांपासून ते क्रेडिट कार्ड वापरतात. महिन्याकाठी 15 हजार रुपयांचा व्यवहार ते करत असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र डिसेंबर महिन्याचा बिल त्यांच्या हातात पडला तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण त्यांच्या क्रेडिट कार्डवरुन 19 डिसेंबर 2018 रोजी 70 हजार 479 रुपयांचे चार अंतरराष्ट्रीय व्यवहार झाले होते.
परदेशी यांना जानेवारी महिन्याचे बिल तब्बल तीन लाख रुपयांचे आले. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कार्डवरून विदेशात सुमारे 2 लाख 80 हजार रुपयांची खरेदी केली. महत्वाचे म्हणजे क्रेडिट कार्डवरून व्यवहार करताना ओटीपी अर्थात वन टाइम पासवर्ड येतो, मात्र परदेशी यांना असा कुठलाही पासवर्ड आला नाही, त्यामुळे व्यवहार झाल्याची त्यांना कल्पना मिळाली नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच परदेशी यांनी बँकेशी संपर्क साधला. शिवाय नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलिसात रीतसर गुन्हा नोंद केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
क्राईम
बातम्या
व्यापार-उद्योग
Advertisement