एक्स्प्लोर

1st March In History : जागतिक नागरी संरक्षण दिन, नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म, वसंतदादा पाटील, तारक मेहता यांचे निधन; आज इतिहासात

1st March In History : आज एक मार्चच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आज जागतिक नागरी संरक्षण दिन साजरा केला जातो. सहकार क्षेत्राला एक वेगळे वळण देणारे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे निधनही आजच्या दिवशी झाले होते.

1st March In History : आज एक मार्चच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आज जागतिक नागरी संरक्षण दिन साजरा केला जातो. तर, रॉलट कायद्याविरोधात महात्मा गांधी यांचा सत्याग्रह आजच्या दिवशी सुरू झाला होता. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे वळण देणारे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे निधनही आजच्या दिवशी झाले होते. तर, बॉलिवूडला मसाला चित्रपटांची सवय लावणारे मनमोहन देसाई यांचे निधनही आजच्या दिवशी झाले होते. त्याशिवाय,  इतिहासात  अनेक घडामोडी घडल्या, जाणून घेऊयात या घटनांबाबत

 

जागतिक नागरी संरक्षण दिन ( World Civil Defence Day )

जागतिक नागरी संरक्षण दिन दरवर्षी १ मार्च रोजी साजरा केला जातो. जगातील नागरी संरक्षण, नागरी संरक्षण, नागरी सुरक्षेबाबत लोकांना जागरुक करणे हा त्याचा उद्देश आहे. जॉर्जेस सेंट-पॉल, एक फ्रेंच सर्जन जनरल, यांनी १९३१ मध्ये असोसिएशन डेस लक्से डी जिनीव्हची स्थापना केली. त्यातून इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर सिव्हिल डिफेन्स (ICDO) ही संस्था स्थापन झाली. अपघात किंवा आपत्तींच्या प्रसंगी नागरी संरक्षण आणि सज्जता आणि प्रतिबंध आणि स्व-संरक्षण उपायांबद्दल जागरुकता वाढवणे, स्वसंरक्षणासाठी लोकांमध्ये जागृती आणणे आदी उद्दिष्ट्य आहेत. नागरी संरक्षणाचे महत्व लक्षात आणून देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 

1818: सिंहगड किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात सिंहगडाचे एक वेगळे महत्त्व आहे. हा किल्ला पेशवाईअखेरपर्यंत पेशव्यांच्या ताब्यात होता. त्याचा उपयोग मुख्यत्वे एक सुरक्षित स्थान व कैदी ठेवण्यासाठी होत असे.  निजामाने 1763 मध्ये पुण्यावर स्वारी केली तेव्हा पेशवे घराण्यातील सर्वांनी सिंहगडावर आसरा घेतला होता. दुसऱ्या बाजीरावाविरुद्ध इंग्रजांनी युद्घ सुरु करताच त्याने आपली संपत्ती व पत्नी राधाबाई यांस सुरक्षिततेसाठी सिंहगडावर ठेवले होते. इंग्रजांनी बाजीरावाचा पाडाव केल्यानंतर 1818 मध्ये प्रिटझ्लरच्या नेतृत्वाखाली सिंहगड जिंकला. त्यांनी तेथील संपत्ती लुटली तसेच तटबंदी पाडली. स्वातंत्र्यापर्यंत हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता.

1919 : रॉलट कायद्याविरोधात महात्मा गांधी यांचा सत्याग्रह

रॉलेट कायदा हा काळा कायदा म्हणूनही ओळखला जातो. 19 मार्च 1919 रोजी ब्रिटीश सरकारने भारतात उदयास येत असलेल्या राष्ट्रीय चळवळीला चिरडून टाकण्याच्या उद्देशाने केलेला हा कायदा होता. हा कायदा सिडनी रॉलट यांच्या अध्यक्षतेखालील राजद्रोह समितीच्या शिफारशींच्या आधारे करण्यात आला होता. या कायद्याविरोधात महात्मा गांधी यांनी सत्याग्रह सुरू केला होता. 

1922 : नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म ( Nanasaheb Dharmadhikari ) 

समर्थ रामदासांच्या दासबोधाचे निरुपणकार असलेले नारायण विष्णू धर्माधिकारी उर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांचा रेवदंडा अलिबाग येथे जन्म. अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रांत त्यांनी कार्य केले. 2008 मध्ये त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण या महाराष्ट्राच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.


1944 : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म

पश्चिम बंगालचे सातवे मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म. ते 2000 ते 2011 या दरम्यानच्या कालावधीत ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. 2011 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. भारतीय डाव्या चळवळीतील ते प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.

1983 : भारतीय बॉक्सर मेरी कोमचा जन्म

भारताची महिला बॉक्सर मेरी कोमचा आज जन्म झाला. मेरी कोमने 8 वेळेस वर्ल्ड बॉक्सिंग स्पर्धा जिंकली आहे. त्याशिवाय, भारतासाठी तिने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकही पटकावले आहे. भारतात महिला बॉक्सिंगसाठी मेरी कोम एक प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व आहे. 

1989 : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे निधन ( Vasantdada Patil )

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे अशी वसंतदादा पाटील यांची ओळख आहे. वसंतदादा पाटील हे 1977 ते 1985 या कालावधीत चार वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. वसंतदादा पाटील हे लहानपणापासून स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते. 1940 नंतर त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात जोमाने सहभाग घेतला. त्यांनी तीन वर्षे कारावासही भोगला होता. सातारा-सांगली या भागांत दादा स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर आघाडीवर होते.

1994 : दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचे निधन (Manmohan Desai)

भारतीय सिनेसृष्टीत आपली वेगळी छाप सोडणारे दिग्दर्शक, निर्माते  मनमोहन देसाई यांचा आज स्मृती दिन. मनमोहन देसाई यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन, निर्मिती केली. मनमोहन देसाई यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 'छलिया' चित्रपटातून केली. मनमोहन देसाई यांनी ब्लफ मास्टर, किस्मत, रोटी, परवरिश, धरमवीर, अमर-अकबर-अँथोनी, नसीब, सुहाग, गंगा जमुना सरस्वती आदी गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन-निर्मिती केली. 

2017 : तारक मेहता यांचे निधन ( Taarak Mehta )

गुजराती विनोदी लेखक, नाटककार तारक मेहता यांचे निधन. त्यांनी गुजराती भाषेत विनोदी नाटकांचे लेखन केले. त्याशिवाय इतर भाषांमधील चांगली नाटकेही गुजराती रंगमंचावर आणली. ' तारक मेहता का उल्टा चष्मा' ही लोकप्रिय मालिका त्यांच्या कथेवर आधारीत आहे. त्यांना 2015 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?Milind Narvekar Special Report : Uddhav Thackeray यांचा शिलेदार मैदानात,मिलिंद नार्वेकर आमदार होणार?Ambadas Danve Suspension Special Report : शिवीगाळ, राजकारण ते निलंबन; दानवे-लाड प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget