19th December In History : काकोरी कटातील क्रांतीकारकांना फाशीची शिक्षा, गोवा मुक्ती दिन; आज इतिहासात
On This Day : आजच्या दिवशी पोर्तुगीज राजवटीपासून गोवा आणि दीव, दमण हे राज्य मुक्त झाले.
19th December In History : आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. स्वातंत्र्य चळवळीत गाजलेल्या काकोरी कटातील क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने आजच्याच दिवशी 1927 मध्ये फाशी दिली होती. आजच्या दिवशी स्वतंत्र भारताने पोर्तुगिजांच्या राजवटीतून गोवा मुक्त करत स्वतंत्र केला. तर, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा आज वाढदिवस आहे.
1927 : काकोरी कटातील तीन क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा
स्वातंत्र्य चळवळीत गाजलेल्या काकोरी कटातील क्रांतिकारी राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान यांना आजच्या दिवशी फाशीची शिक्षा देण्यात आली. काकोरी जवळ हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन या सशस्त्र क्रांतिकारांच्या संघटनेने सरकारी खजिना लुटला. अवघ्या काही क्रांतिकारकांनी ही योजना यशस्वी केली. ही लूट म्हणजे ब्रिटीश सत्तेला आव्हान होते. ब्रिटीशांनी या कटातील आरोपींची धरपकड केली. काहींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तर, काकोरी कटात महत्त्वाची भूमिका बजावणारे राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. तर, चंद्रशेखर आझाद हे ब्रिटीशांच्या हाती लागले नाहीत. ब्रिटीशांनी केलेल्या कारवाईमुळे हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन ही संघटना पूर्णपणे कमकुवत झाली.
1969 : गोवा मुक्ती दिन
गोवा, दमण आणि दीव तसेच दादरा आणि नगर हवेली या भागावर जवळपास 450 वर्षे सत्ता असणाऱ्या पोर्तुगीज राजवटीची आजच्या दिवशी अखेर झाली.
15 ऑगस्ट 1947 रोजा भारताला स्वतंत्र्य मिळाले. पण त्यानंतरही महाराष्ट्रा शेजारच्या गोव्यातील जनतेला मात्र स्वातंत्र्यांची पहाट पाहण्यासाठी आणखी 14 वर्ष वाट पाहावी लागली. पोर्तुगीजांनी गोवन भूमी आपल्या मालकीची समजली आणि राजवट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यानंतर गोवा स्वातंत्र्य लढ्याची धार तीव्र झाली. सशस्त्र आणि अहिंसक, सत्याग्रह या मार्गाने गोव्याचा स्वातंत्र्य लढा सुरू होता. तब्बल 14 वर्ष संघर्ष सुरू होता. अखेर 19 डिसेंबर 1961 ला गोवा स्वतंत्र झाला. भारतीय जवानांनी कारवाई करत अवघ्या 36 तासांत गोवा मुक्त केला. 19 डिसेंबर 1961 रोजी गोव्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर 30 मे 1987 रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला आणि अशा प्रकारे गोवा हे भारतीय प्रजासत्ताकचे 25 वे राज्य बनले.
1983 : फिफा वर्ल्डकप चषक चोरीला
आजच्याच दिवशी 1983 मध्ये फिफा वर्ल्डकपची ट्रॉफी चोरीला गेली होती. ब्राझीलची राजधानी रिओ-डी-जनेरियो येथे ज्युल्स रिमे ट्रॉफी (त्यावेळी फिफा विश्वचषक ट्रॉफी याच नावाने ओळखली जात होती) चोरीला गेली. ब्राझिलियन फुटबॉल असोसिएशनच्या मुख्यालयात बुलेटप्रूफ काचेच्या शो केसमध्ये फिफाची ट्रॉफी ठेवण्यात आली होती. पण चोरांनी शिताफीनं ट्रॉफी गायब केली. चोरीला गेलेली ट्रॉफी पुन्हा कधीच मिळाली नाही. याआधी 1966 मध्ये ट्रॉफी चोरीला गेली होती. लंडनमधील वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये ही ट्रॉफी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. तेथून ही ट्रॉफी चोरीला गेली होती.
इतर महत्त्वाच्या घटना :
1860: भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे – डलहौसी यांचे निधन
1899 : मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते मार्टिन ल्यूथर किंग (सिनियर) यांचा जन्म.
1906: रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस लिओनिद ब्रेझनेव्ह यांचा जन्म
1919: चरित्र अभिनेते ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ओमप्रकाश यांचा जन्म
1934: भारताच्या 12 व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा जन्म.
1941 : दुसरे महायुद्ध – अॅडॉल्फ हिटलर जर्मन सैन्याचे सरसेनापती बनले.
1969: भारतीय क्रिकेटपटू नयन मोंगिया यांचा जन्म.
2002 : व्ही. एन. खरे यांनी भारताचे 33 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.