एक्स्प्लोर
आता पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमनसाठी एकच हेल्पलाइन नंबर

मुंबई : राज्यात आता पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन या आपत्कालीन सेवांसाठी 112 हा एकच हेल्पलाइन नंबर असणार आहे. आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी या यंत्रणांचा समन्वय साधावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेतला आहे. अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी पोलिस, रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दल यांची मदत घेतांना वेगवेगळ्या क्रमांकावर संपर्क करावा लागतो. पोलिसांसाठी 100, रुग्णवाहिकेसाठी 102 तर अग्निशमन सेवेसाठी 101 असे नंबर आहेत. अनेकदा संबंधित यंत्रणांचाही समन्वय साधताना गोंधळ उडालेला बघायला मिळतो. म्हणूनच राज्यामध्ये एकच हेल्पलाईन असावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेतला आहे. यासाठी गृहविभागाने एक सल्लागार कंपनीही नेमली आहे. ही सल्लागार कंपनी 112 या हेल्पलाईनबाबात काय पावले उचलावी लागतील, आवश्यक यंत्रणा, मनुष्यबळ किती लागेल, याबाबत अहवाल तयार करत आहे. अहवालानंतर पुढील पाऊल उचललं जाईल.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
कोल्हापूर
महाराष्ट्र























