एक्स्प्लोर
रांगोळीतून साकारली बाप्पाची 108 रुपं, विक्रमाची लिम्का बुकात नोंद
औरंगाबादः औरंगाबादमध्ये श्रीगणेशाचे 108 रुपं रांगोळीतून साकारण्यात आली. रांगोळीतून साकारलेल्या या विविध श्रीगणेशाची रुपं प्रदर्शनात मांडण्यात आली. या प्रदर्शनाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.
औरंगाबादच्या जान्हवी जोशी यांनी वक्रतुंड, एकदंत, लंबोदर, गजानन अशा 108 श्रीगणेशाची रुपं साकारली. रांगोळीतून साकारलेल्या या श्रीगणेशांच्या प्रतिमांचं प्रदर्शनं औरंगाबादच्या कलश मंगल कार्यालयात भरवण्यात आल होतं.
असे साकारले बाप्पा
जान्हवी जोशी यांनी 50 बाय 50 सेमी आकाराच्या पुठ्ठ्यावर रांगोळीच्या माध्यमातून 108 श्रीगणेश प्रतिमा रेखाटल्या असून, सर्व प्रतिमा वेगवेगळ्या आहेत. त्यांची रंगसंगती प्रत्येक प्रतिमेत वेगळी वापरण्यात आली. अशा पद्धतीने या कलाकृतीद्वारे वेगळेपण जपणाऱ्या जान्हवी यांनी अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे.
जान्हवी यांनी सलग सात दिवस रोज दहा ते बारा तास रांगोळी काढत जवळपास 72 तास काम करून बाप्पाची ही 108 रुपं साकारली. यासाठी प्रत्येक रंगाची जवळपास 7 ते 8 किलो रांगोळीचा वापर केला.
रांगोळी हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. मात्र जान्हवी जोशी यांनी रांगोळीच्या छंदातून विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. आगामी काळात इतर भाषेतील अक्षरातून गणेशमूर्ती साकारण्याचा जान्हवी यांचा मानस आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement