Prakash Ambedkar : यशवंतराव चव्हाण तत्वनिष्ठ नेते होते, ते शरद पवारांसारखे भागुबाई नव्हते; प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका
Prakash Ambedkar : मराठ्यांना माझे सांगणे आहे की, यशवंतराव चव्हाण तत्वनिष्ठ नेते होते, ते शरद पवारांसारखे भागुबाई नव्हते, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
लातूर : मराठ्यांना माझे सांगणे आहे की, यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) तत्वनिष्ठ नेते होते, ते शरद पवारांसारखे (Sharad Pawar) भागुबाई नव्हते, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे (Vandhit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे. आज व्ही एस पँथरचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके (Vinod Khatke) यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर केला. या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, येणारे काही महिने हा वादळी काळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला यातून शासनाचा भ्रष्टाचार समोर आला आहे.सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राजकारणाचा आधारस्तंभ हा विकास नाहीतर दंगल घडविणे आहे. मुलींच्या अत्याचारावर मोर्चे निघाले, अत्याचार वाढले पण त्याची विटंबना ही होत आहे हे किती दुर्दैवी आहे. पण ही विटंबना आलीच कोठून फाशी देऊन हे मिटणार नाही. पण जे पेरलं तेच उगवतं. आता राजकारणातून हेच पेरलं जात आहे, असे त्यांनी म्हटले.
विधानसभेची निवडणूक मराठा आणि ओबीसी अशीच
ते पुढे म्हणाले की, राजकारण, भाषण, मोबाईल, बातम्या यातून केवळ द्वेषाच सांगितले जात आहे. ही हिंसाच आहे आणि तेच आता घडत आहे. यातूनच लैंगिक अत्याचार वाढत आहे. शांतता, शरीराचा आदर पेरला तर या घटना कमी होतील. अत्याचाराच्या घटनामागे आरएसएस, भाजप, बजरंग दल यांची प्रक्षोभक भाषणे आहेत. द्वेषाच्या औषधातून या घटना घडत आहेत. विधानसभेची निवडणूक ही मराठा आणि ओबीसी अशीच आहे. आरक्षण बचाव यात्रा काढली म्हणून मराठवाडा शांत आहे.
प्रकाश आंबेडकरांची शरद पवारांवर टीका
परिस्थिती हाताबाहेर जात आहे आणि सरकारचे यावर नियंत्रण नाही. सर्व नेते हे पळपुटे आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर पवार स्पष्ट भूमिका मांडत नाहीत. पाठिंबा का विरोध हे देखील सांगत नाहीत. जात बघून मतदान करणार असाल तर तो सर्वात मोठा धोका आहे. मराठ्यांना माझे सांगणे आहे. तत्व पाहिजे यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे पण भित्र भागूबाई म्हणजे शरद पवार यांच्यासारखे ते नव्हते, अशी टीका त्यांनी यावेळी शरद पवारांवर केली.
मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही तर...
कोसळलेल्या पुतल्यावर आणखीन काही दिवस आवाज उठेल, मग पुन्हा सर्व शांत होईल. मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही तर घ्या आता 40 सैनिक मारले गेले, असे झाल्यावर रडता कशाला मग. देशाची इभ्रत राखली जाईल, एवढी कुवत केंद्र सरकारमध्ये नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
आणखी वाचा