एक्स्प्लोर

Prakash Ambedkar : माती, प्लास्टर ऑफ पॅरिस चे पुतळे पडले नाही, मग धातूचा पुतळा पडलाच कसा? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल 

माती, प्लास्टर ऑफ पॅरिसचे अनेक पुतळ्यांचे उद्घाटन मी केलंय, पण ते कधी पडले नाही. ताशी 45 किलोमीटर हवा आली तरी हे पुतळे पडले नाही,  मग हा धातूचा पुतळा कसा पडला? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.

Prakash Ambedkar नांदेड : छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा पडल्यावर पंतप्रधानांनी माफी मागितली असली तरी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माफी मागितली नाही. माती, प्लास्टिक आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे अनेक पुतळ्यांचे उद्घाटन मी केलंय, पण ते कधी पडले नाही. ताशी 45 किलोमीटर हवा आली तरी हे पुतळे पडले नाही,  मग हा धातूचा पुतळा कसा पडला? किंबहुना पुतळा पडला की पाडला? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उपस्थित केलाय. ते नांदेड (Nanded News) येथे बोलत होते.

सत्ताधारी स्वताच्या विरोधात आंदोलन करत आहेत- प्रकाश आंबेडकर

आज महाविकास आघाडी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. तर सत्ताधारी भाजप महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करत आहे. त्यावरून सत्ताधारी स्वतःच्या विरोधात आंदोलन करत आहेत का? की केवळ विरोधात आहोत हे दाखवण्यासाठी आंदोलन करत आहेत, कारण सांगलीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एका व्यासपीठावर होते,  असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी लगावला आहे. 

संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा-  प्रकाश आंबेडकर

सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका संदर्भात अनेक वक्तव्य पुढे आले आहेत. परंतु धातूचा पुतळा हा कितीही कमजोर असला तरीही तो पडू शकत नाही. जुन्या काळात देखील बाबासाहेबांचा, महात्मा फूले किंवा इतर महापुरुषांचे पुतळे असतील ते गावागावत बसवले गेलेत. त्यावेळी ते नुसते चबुतर्‍यावर बसवले गेलेत. मात्र ते कधी पडल्याची घटना घडली नाही. पुतळे विद्रूप करण्याच्या, विटंबना करण्याच्या बातम्या आजवर आल्या आहेत. मात्र पुतळा पडल्याच्या बातम्या माझ्या तरी बघण्यात अथवा ऐकण्यात नाही. त्यामुळे मला असा संशय येतो आहे की हा पुतळा पडला की पाडला?

कारण राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती बघता ती कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला आहे. त्यामुळे जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम तर यात केल्या गेल्या नाही ना? अशा संशयाला जागा आहे. त्यामुळे या पुतळा पडला की पाडला याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Singham Again : बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Pandey Join BJP : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणारBus Boook Modi Event : मोदींच्या कार्यक्रमासाठी तीन दिवस एसटीच्या 760 बस बुकिंगSidco Home Lottery : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सिडकोच्या घरांचा धमाका, 40 हजार गरांची लॉटरी निघणारCongress Protest : काँग्रेसचं नाशिक, नागपुरात आंदोलन आंदोलकांची घोषणाबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Singham Again : बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
Rupali Chakankar vs Rohini Khadse : रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Embed widget