एक्स्प्लोर

Shahu Maharaj on Vishalgad Encroachment : तर विशाळगडची घटना टळली असती, हे जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अपयश; खासदार शाहू छत्रपतींची सडकून टीका

Shahu Maharaj on Vishalgad Encroachment

Shahu Maharaj on Vishalgad Encroachment : विशाळगड येथील अतिक्रमणे हटवण्याच्या निमित्ताने झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा असून घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना घडली, हे अत्यंत क्लेशदायक आहे, अशी प्रतिक्रिया खासदार शाहू छत्रपती यांनी दिली आहे. शाहू महाराज यांनी पत्रक प्रसिद्धीस देताना संभाजीराजेंच्या भूमिकेचा निषेध केला आहे. माजी खासदार संभाजीराजे यांनी याप्रश्नी आंदोलनाचे नेतृत्व केले आणि सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली. परंतु त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जो हिंसाचार झाला, त्याचा आम्ही स्पष्ट शब्दात तीव्र निषेध करतो, असे शाहू महाराज यांनी म्हटले आहे. 

काय म्हटलं आहे निवेदनात?

यासंदर्भात प्रशासनाने विशाळगड प्रश्न गांभीर्याने घेऊन माजी खासदार संभाजीराजे व मुख्यमंत्री यांची भेट तसेच चर्चा घडवून आणावी अशा सूचना आम्ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांना या घटनेपूर्वी दिल्या होत्या. परंतु, राज्यशासन, प्रशासन आणि पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य ती खबरदारी गांभीर्याने घेतली नाही, त्यामुळे ही घटना घडली. हे जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अपयश आहे. राज्यसरकारने रविवारी अतिक्रमण काढण्या संदर्भात जिल्हा प्रशासनाला जे आदेश दिले तेच आदेश या पूर्वी दिले असते तर ही घटना टळली असती. या हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई करावी.

माजी खासदार संभाजीराजे यांनी याप्रश्नी आंदोलनाचे नेतृत्व केले आणि सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली. परंतु त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जो हिंसाचार झाला, त्याचा आम्ही स्पष्ट शब्दात तीव्र निषेध करतो.

तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची

हिंसाचारामध्ये ज्या निष्पाप लोकांचे नुकसान झाले, त्यांना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी. सरकारने काही केले नाही, तर कोल्हापूरची जनता त्यासाठी पुढाकार घेईल. उद्या (मंगळवारी) आम्ही घटनास्थळी भेट देवून पाहणी करणार आहोत. कोणत्याही समाजघटकांवर अन्याय होत असेल तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. विशाळगडावरील अतिक्रमणे सरसकट काढण्याची कारवाई प्रशासनाने तातडीने करावी. त्या संदर्भात कोणताही दुजाभाव केला जाऊ नये.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MHADA : म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
Palghar : रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला
नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole on Zeeshan Siddique : झिशान सिद्दिकी यांना त्यांची जागा दाखवणार, नाना पटोले संतापलेZeeshan Siddique : क्रॉस व्होटिंगबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट, Chennithala यांचं नाव घेत म्हणाले...Jarange vs Fadnavis Special Report : जरांगेच्या निशाण्यावर युतीचे बॉस, प्रत्युत्तरात 'संन्यास'Aditya Thackeray Narali Poornima : आदित्य ठाकरेंनी कोळी बांधवांसोबत साजरी केली नारळी पौर्णिमा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MHADA : म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
Palghar : रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला
नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
Narendra Modi : झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनचा दौरा करणार, रशियाच्या भूमिकेकडे लक्ष
झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनच्या दौऱ्यावर जाणार
धक्कादायक! प्रियकराच्या गुप्तांगावर उलातन्याने वार, स्व-संरक्षणाठी प्रेयसीकडून हल्ला; गुन्हा दाखल
धक्कादायक! प्रियकराच्या गुप्तांगावर उलातन्याने वार, स्व-संरक्षणाठी प्रेयसीकडून हल्ला; गुन्हा दाखल
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
Embed widget