Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजेंवर अटकेची टांगती तलवार; स्वत: शाहूवाडी पोलिस स्टेशनला हजर होण्यासाठी रवाना
मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असून मी स्वतः शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे हजर होण्यास जात आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
कोल्हापूर : विशाळगड आणि पायथ्याला झालेल्या हिंसक घटनानंतर कोल्हापूर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संभाजीराजेंवर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असून मी स्वतः शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे हजर होण्यास जात आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा, असे म्हटले आहे. संभाजीराजे यांनी आज गुन्हे दाखल झाल्यानंतर पत्रकार परिषद घेत प्रशासनावर जोरदार टीका केली.
काल विशाळगड येथे झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केलेली आहे. काही शिवभक्तांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी व स्वतःचा बेजबाबदारपणा लपविण्यासाठी जाणीवपूर्वक शिवभक्तांना लक्ष्य करत आहे. मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी…
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 15, 2024
संभाजीराजे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, काल विशाळगड येथे झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केलेली आहे. काही शिवभक्तांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी व स्वतःचा बेजबाबदारपणा लपविण्यासाठी जाणीवपूर्वक शिवभक्तांना लक्ष्य करत आहे. मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असून मी स्वतः शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे हजर होण्यास जात आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा.
संभाजीराजे काय म्हणाले?
- 158 पैकी सात आणि सहा हे दोनच अतिक्रमण न्यायप्रविष्ठ आहेत, मग बाकीचे अतिक्रमण तुम्ही का काढला नाही?
- अतिक्रमण काढण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता तर मग गेलं दीड वर्षात का काढलं नाही?
- येथील एक स्थानिक नेता पालकमंत्री मला पुरोगामी विचार शिकवतात, माझा त्यांना प्रश्न आहे की, प्रश्न न्यायप्रविष्ठ आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं?
- प्रशासनाला माहीत होतं शिवभक्त येणार आहेत मग त्यांनी आधीच निर्णय का दिला नाही?
- मी विशाळगडावर जाणार आहे माहित होतं, तर पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला हवा होता
- माझ्यावर गुन्हा नोंद केला असेल तर मी शाहूवाडी पोलीस स्टेशनला आत्ताच जातो.
- विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासंदर्भातील भूमिका यापूर्वी स्वीकाराला हवी होती
- बैठकीचा निमंत्रण आलं होतं. मात्र त्यांना आम्ही कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवाल हा प्रश्न आधी विचारला. मात्र, यावर प्रशासनाने काही उत्तर दिलं नाही
इतर महत्वाच्या बातम्या