Ambabai Mandir Kirnotsav : अंबाबाई किरणोत्सव मार्गातील अडथळ्यांची आज होणार पाहणी
Ambabai Mandir : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील (Ambabai Mandir) किरणोत्सव मार्गातील (Ambabai Mandir Kirnotsav) अडथळ्यांची पाहणी आज केली जाणार आहे.
Ambabai Mandir : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील (Ambabai Mandir) किरणोत्सव मार्गातील (Ambabai Mandir Kirnotsav) अडथळ्यांची पाहणी आज केली जाणार आहे. या पाहणीवेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे मुख्य शहर अभियंता, नगररचना सहायक संचालक, बी वॉर्ड ऑफिसर यांनी प्रतिनिधी न पाठवता व्यक्तिशः उपस्थित राहावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून करण्यात आलं आहे. आज सायंकाळी चारनंतर ही पाहणी करण्यात येणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने कोल्हापूर महानगरपालिकेला महाद्वार रोडवरील अतिक्रमणे काढण्यासाठी पत्र लिहिले होते. किरणोत्सवाला (Ambabai Mandir Kirnotsav) कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी देवस्थान समितीने मनपाला पत्र पाठवले होते. अंबाबाई मंदिरात किरणोत्सव 30 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्याच तयारीचा एक भाग म्हणून, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने किरणोत्सव मार्गाचे सर्वेक्षण केले होते.
अंबाबाई मंदिरात वर्षातून दोनदा किरणोत्सव
या सर्वेक्षणानंतर सूर्यकिरणांच्या मार्गात अजूनही अनेक अडथळे असल्याचे आढळून आले. अंबाबाई मंदिरात वर्षातून दोनदा किरणोत्सव होतो. 9 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या किरणोत्सवावेळी काही इमारतींचे पत्रे, फलक, झाडाच्या फांद्या असे विविध अडथळे असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे किरणोत्सव अपूर्ण राहिल्याने भाविकांची निराशा होते. या पार्श्वभूमीवर येत्या 30 जानेवारीपासून होणाऱ्या किरणोत्सवाची तयारी सुरू करण्यात आली आहे. या मार्गातील सर्व अडथळे काढण्यासाठी देवस्थान समितीसह महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. अंबाबाईचा वर्षातून दोनदा किरणोत्सव सोहळा पार पडत असतो. या सोहळ्यात मावळतीची सूर्यकिरणे महाद्वारातून अंबाबाई मंदिरात प्रवेश करतात. प्रवासाचा एक एक टप्पा पार करत पहिल्या दिवशी किरणे अंबाबाईच्या मूर्तीचा चरणस्पर्श करतात. दुसऱ्यादिवशी कमरेपर्यंत आणि तिसऱ्या दिवशी ही किरणं चेहऱ्यावर येऊन किरणोत्सव पूर्ण होतो.
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या किरणोत्सवात सायंकाळी 4 वाजून 59 मिनिटांनी सूर्यकिरणे महाद्वारातून मंदिरात आली आणि 5 वाजून 44 मिनिटांनी किरणांनी अंबाबाई मूर्तीचा चरणस्पर्श केले आणि 5 वाजून 46 मिनिटांनी किरणांनी देवीच्या कंबरेला स्पर्श करत 5 वाजून 47 मिनिटांनी सूर्याची किरणे श्री अंबाबाईच्या गळ्याला स्पर्श करत 5 वाजून 48 मिनिटांनी सूर्य किरण हे देवीच्या चेहऱ्यावर आले आणि लुप्त झाली होती.
इतर महत्वाच्या बातम्या