एक्स्प्लोर

NIA Raids PFI Maharashtra : पीएफआय प्रकरणात एनआयएकडून कोल्हापूरमध्येही छापेमारी, एक संशयित ताब्यात

NIA Raids PFI Maharashtra : दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएकडून महाराष्ट्रासह देशभरात छापेमारी केली आहे. पीएफआयने पुणे जिल्ह्याला आपले मुख्य केंद्र तयार केल्याची माहिती समोर येत आहे.

NIA Raids PFI Maharashtra : दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएकडून महाराष्ट्रासह देशभरात छापेमारी केली आहे. महाराष्ट्रातील गुप्तचर संस्थांनी तपास यंत्रणांना दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयने पुणे जिल्ह्याला आपले मुख्य केंद्र तयार केले आहे. पुण्यातील काही ठिकाणी प्रशिक्षण केंद्र चालवले जात आहेत. शिवाय SDPI संघटनेकडून जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात सभासद नोंदणी सुरू केली असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. 

दरम्यान, एनआयएकडून राज्यामध्ये  मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये एनआयए, महाराष्ट्र एटीएसने कारवाई केली आहे.

पीएफआय प्रकरणात कोल्हापूरमध्येही छापेमारी  

दरम्यान, एनआए आणि पीएफआय प्रकरणात कोल्हापूरमध्येही कारवाई करण्यात आली आहे. पीएफआयचा पदाधिकारी असल्याच्या संशयातून जवाहरनगरमधून एकाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संशयिताच्या घराला सध्या कुलूप आहे. 

कोल्हापूरमध्ये एनआयएचा गैरसमज आणि कुटुंब भयभित

यापूर्वी 31 जुलै रोजी एनआयएकडून देशभरातील आयसिस माॅड्यूलचा नायनाट करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सहा राज्यांमधील 13 जिल्ह्यांमध्ये काल धाड टाकण्यात आली होती.  यामध्ये राज्यातील नांदेड आणि कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होता. 

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रेंदाळमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने इर्शाद शौकत शेख आणि अल्ताफ शौकत शेख यांना ताब्यात घेत चौकशी केली. सहा तासांच्या चौकशीनंतर केवळ नावामध्ये साधर्म्य असल्याचा साक्षात्कार एनआयए पथकाला झाला आणि त्यांना सोडून देण्यात आले होते. तोपर्यंत जमावाने त्यांच्या कार्यालयावर हल्ला करून नासधूस  केली होती. त्यामुळे संपूर्ण कुटुंब भयभित झाले होते.  

इर्शाद शेखकडून लब्बैक इमदाद फौंडेशन संस्था चालवली जाते. मात्र, तपास यंत्रणेला हवी असणारी आणि ही संस्था वेगळीच असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. मात्र, आपली मुलं देशविघातक कृत्य करू शकत नाहीत हे सांगताना दोन भावांच्या वृद्ध वडिलांना रडू कोसळले होते. पोलिसांनी परिस्थितीचे भान राखत घराला चोख बंदोबस्त दिल्याने आणि चौकशीअंती काहीच संबंध नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुबीयांचा जीवात जीव आला होता.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
धक्कादायक! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, खाजगी सावकारीतून घटना घडल्याची माहिती, कोल्हापुरात खळबळ 
धक्कादायक! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, खाजगी सावकारीतून घटना घडल्याची माहिती, कोल्हापुरात खळबळ 
Kolhapur Crime: मुलगी झाल्यामुळे सासरच्यांनी कोल्हापूरात विवाहितेला संपवल्याचा आरोप, नवरा, सासू-सासरे अन् नणंदेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
मुलगी झाल्यामुळे सासरच्यांनी कोल्हापूरात विवाहितेला संपवल्याचा आरोप, नवरा, सासू-सासरे अन् नणंदेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
Kolhapur Asmita Katkar Death Case: मुलाचे कपडे घेतलेले, पण मुलगी झाली; 52 हजारांचा पाळणा, 4 जणांनी माझ्या मुलीचा जीव घेतला, अस्मिताच्या आई-वडिलांचे हादरवणारे आरोप
मुलाचे कपडे घेतलेले, पण मुलगी झाली; 52 हजारांचा पाळणा, 4 जणांनी माझ्या मुलीचा जीव घेतला, अस्मिताच्या आई-वडिलांचे हादरवणारे आरोप

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
Embed widget