(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NIA, ATS Raids Live Updates : केंद्रीय तपास यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये, महाराष्ट्रातसह देशभरात छापेमारी, वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर....
NIA, ATS Raids Live Updates : केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाराष्ट्रात छापेमारी करण्यात येत आहे. देशातील 10 राज्यांमध्ये NIA ने छापे टाकले आहेत. या प्रकरणी प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...
LIVE
Background
NIA, ATS Raids Maharashtra Live Updates : केंद्रीय तपास यंत्रणांकडून दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत केल्याप्रकरणी छापेमारी करण्यात येत आहे. देशात महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये एनआयए (NIA) आणि ईडीकडून छापेमारी सुरु आहे. गुरुवारी पहाटेपासून एनआयएकडून राज्यात छापेमारी सुरु आहे. या कारवाईत केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई येथे मोठ्या प्रमाणात छापेमारी सुरु आहे. मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेड येथे आयपीसी आणि यूएपीएच्या विविध कलमांनुसार दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये समाजात तेढ निर्माण करणे आणि असा कट रचणे याप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातून आतापर्यंत पीएफआयशी संबंधित 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयांवर देशभरात छापेमारी (NIA Raids on PFI office) सुरू केली आहे. महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, भिवंडी, मालेगावसह इतर ठिकाणी छापेमारी सुरू केल्याचे वृत्त आहे. एनआयएने मध्यरात्री तीन वाजताच नवी मुंबईतील नेरूळमधील सेक्टर 23 मधील PFI च्या कार्यालयावर छापा मारला. तर, पुण्यातही कारवाई सुरू असून दोघांना ताब्यात घेतले आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते अब्दुल कय्याम शेख आणि रझा खान या दोघांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. मालेगावमधूनही एटीएसने एकाला ताब्यात घेतले आहे. औरंगाबादमधून एटीएसने चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएकडून छापेमारी सुरू आहे. महाराष्ट्रातील गुप्तचर संस्थांनी तपास यंत्रणांना दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयने पुणे जिल्ह्याला आपले मुख्य केंद्र तयार केले आहे. पुण्यातील काही ठिकाणी प्रशिक्षण केंद्र चालवले जात आहेत. त्याशिवाय SDPI संघटनेकडून जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात सभासद नोंदणी सुरू केली असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले.
देशभरात केंद्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) छापेमारी सुरु आहे. टेरर फंडिग प्रकरणात ही कारवाई सुरु आहे. या संदर्भात कारवाई करत NIAने 10 राज्यांमध्ये छापेमारी केली आहे. केरळमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) संघटनेचे पदाधिकारी तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. केरळमध्ये एनआयएकडून सुमारे 50 ठिकाणी छापेमारी सुरु आहे. ही संपूर्ण कारवाई टेरर फंडिंग प्रकरणावरून म्हणजेच दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी ही कारवाई सुरु आहे. सुरू आहे. देशातील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली ही कारवाई सुरु आहे. केरळमधील मांजेरी, मल्लापुरम या भागांमध्ये ही छापेमारी सुरू आहे. दरम्यान देशात महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्येही केंद्रीय तपास यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये आहेत.
Jalgaon ATS Action : अकोला एटीएसच्या कारवाईत जालन्यातील तरुणाला जळगावामध्ये अटक
NIA-ATS कडून औरंगाबादसह परभणीत छापेमारी;पॉप्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात
NIA Raids PFI Maharashtra: राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयांवर देशभरात छापेमारी (NIA Raids on PFI office) सुरू केली आहे. ज्यात औरंगाबादमधून एटीएसने चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरात एकच खळबळ उडाली आहे
NIA Raid Pune: पुण्यात NIA ची मोठी कारवाई; PFI चा कार्यकर्ता रझी खान तपास यंत्रणांच्या ताब्यात
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front Of India-PFI) या संघटनेच्या पुण्यातील कोंढवा भागातील मुख्य कार्यालयावर NIA, ATS आणि इतरही काही तपास यंत्रणांनी छापे टाकले आहेत. या छाप्यात 'PFI'च्या कार्यालयातील काही साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर नाशिकमधे दाखल असलेल्या गुन्ह्यांबद्दल काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. पीएफआयचं महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय पुण्यातील कोंढवा भागात आहे.
ATS, NIA Maharashtra Raid : महाराष्ट्र एटीएसकडून PFI संघटनेविरुद्ध छार गुन्हे दाखल
महाराष्ट्र एटीएसने पीएफआय संघटनेविरुद्ध चार गुन्हेही दाखल केले आहेत. औरंगाबाद, बीड, परभणी, मालेगाव, मुंबई आणि नवी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आज महाराष्ट्र एटीएसचे छापे सुरू आहेत. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण महाराष्ट्रात 20 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Bhiwanid ATS, NIA Raid : PFI या संघटनेसंदर्भातील एक जण भिवंडीतून ताब्यात
भिवंडी : NIA ने देशभरात PFI या संघटनेवर सुरू केलेल्या कारवाईत भिवंडीतुन मोईनुद्दीन मोमीन बंगालपुरा याला ताब्यात घेतलं.