Kolhapur News : कोल्हापुरात तब्बल आठवडाभर मटण, चिकन मिळणार नाहीच? अखेर महापालिकेने केला खुलासा!
Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत आज आणि 31 ऑगस्ट रोजी या दोनच दिवशी कत्तलखाने बंद राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.
Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत आज आणि 31 ऑगस्ट रोजी या दोनच दिवशी कत्तलखाने बंद राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. मांस विक्री आठवडाभर बंद राहणार असल्याच्या परिपत्रकानंतर गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर महापालिकेकडून खुलासा करण्यात आला.
जैन समाजातील पर्युषण पर्व सुरू झाल्याने या काळामध्ये बळी देऊ नये अशी मागणी जैन समाजाने केली होती. त्यानंतर दोन दिवस मटण विक्री बंद ठेवण्याची भूमिका कोल्हापूर शहरातील खाटीक समाजाने घेतली होती. तथापि, कोल्हापूर महापालिकेने काढलेल्या परिपत्रकाने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर कोल्हापूर मनपा हद्दीमध्ये 8 दिवस नाही तर केवळ 2 दिवस मटण विक्रीची दुकानं बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
मात्र, दोन दिवस तरी दुकाने बंद का ठेवायची? अशीही भूमिका काही जणांनी घेतली. जैन धर्मियांच्या पर्युषण महापर्व काळात 24 ते 31 ऑगस्ट या कालावधीत कत्तलखाने बंद ठेवले जावून या काळात मटण,मांस विक्री बंद ठेवली जाणार, असे वृत्त पसरल्यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला होता.
त्यानंतर महापालिकेने खुलासा करत आज व 31 ऑगस्ट या दोनच दिवशी कत्तलखाने बंद राहणार असल्याचे सांगतिले. या दोनच दिवशी कत्तलखाने बंद राहणार आहेत, याची सर्व कत्तलखाने व मांस विक्रेते या सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कोल्हापूर महानगपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या