Lumpy Skin Disease : कोल्हापूर जिल्ह्याला लम्पी चर्मरोगाचा वाढता विळखा, आतापर्यंत 712 पशुधन बाधित, 33 मृत्यूमुखी
Lumpy Skin Disease : संपूर्ण देशासह राज्यातही पशुधनामधील लम्पी चर्मरोगाने थैमान घातले आहे. या रोगाने आता कोल्हापूर जिल्ह्यातही पाय पसरले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 31 जनावरांना लागण झाली आहे.
Lumpy Skin Disease : संपूर्ण देशासह राज्यातही पशुधनामधील लम्पी चर्मरोगाने थैमान घातले आहे. या रोगाने आता कोल्हापूर जिल्ह्यातही पाय पसरले आहेत. जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात प्रथम या रोगाने बाधित जनावराची पहिली केस समोर आल्यानंतर आता हा आकडा तब्बल 712 वर जाऊन पोहोचला आहे. बाधितांचा आकडा वाढत असतानाच रोगमुक्तीदरही वाढत असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
गेल्या 24 तासांमध्ये 31 जनावरांना लागण
जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांमध्ये 30 गायींना लम्पी चर्मरोगाची लागण झाली आहे. एक बैलही गेल्या 24 तासांमध्ये बाधित झाला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात लम्पीने शिरकाव केल्यापासून बाधित गायींची संख्या 595 वर जाऊन पोहोचला आहे. दुसरीकडे बाधित बैलांची संख्या 117 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित पशुधनाची संख्या 712 वर जाऊन पोहोचली आहे.
गेल्या 24 तासांमध्ये चार जनावरांचा मृत्यू
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासामध्ये लम्पी चर्मरोगाची लागण होऊन 4 गायींचा मृत्यू झाला. यामध्ये अब्दुलल्लाट आणि कोडोलीमध्ये प्रत्येकी दोन गायींचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 21 गायी आणि 12 बैलांचा मृत्यू झाल्याने पशुधन शेतकऱ्यांवर मोठा आघात झाला आहे.
रोगमुक्तीदर वाढत असल्याने काहीसा दिलासा
बाधित झालेल्या जनावरांमध्ये मृत्यूचे प्रमाण चिंताजनक असले, तरी रोगमुक्ती दर 32.3 टक्क्यांवर पोहोचल्याने दिलासा मिळाला आहे. मृत्यू दर 4.63 टक्के असून बाधित दर 0.25 टक्के आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरणही वेगाने
पशुधनांमधील लम्पी चर्मरोगाचा प्रकोप वाढतच चालल्याने स्थानिक प्रशासनाकडून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी वेग देण्यात आला आहे. संपूर्ण कोल्हापूर शहरामधील भटक्या व पाळीव गाय वर्गीय जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 8 हजार 346 गायींचे लसीकरण करण्यात आल आहे. जिल्ह्यातील 13 हजार 561 बैलांचेही लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण लसीकरणाचा आकडा 2 लाख 21 हजा 907 वर जाऊन पोहोचला आहे.
दुसरीकडे कोल्हापूर शहरामध्ये 1297 भटक्या व पाळीव गाय वर्गीय जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये भटक्या 133 जनावरांना लस देऊन त्यांना लाल रंगाचे निशाण करण्यात आलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या