kolhapur zilla parishad: कोल्हापूर झेडपीसाठी तालुकानिहाय गटांसाठी आरक्षण निश्चित; भुदरगड, चंदगड तालुक्यात 'महिलाराज'
जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत काढण्यात आली. आरक्षण निश्चित झाल्याने गावगाड्यात राजकारणाला वेग येणार आहे

ZP Kolhapur Ward Reservation: कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी आरक्षण निश्चित झालं आहे. जिल्हा परिषदेच तालुकानिहाय गटामध्ये आरक्षण निश्चित झालं आहे. चंदगडमधील चारही गटावर महिला आरक्षण, दोन खुल्या प्रवर्गातील महिला असतील. दुसरीकडे, भुदरगड तालुक्यामध्येही चार गटावर महिला राज, तीन खुल्या, एक ओबीसी असे चित्र आहे. जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत काढण्यात आली. आरक्षण निश्चित झाल्याने गावगाड्यात राजकारणाला वेग येणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून इच्छुकांनी केलेल्या तयारीला प्रत्यक्ष आता वेग येणार असून दिवाळीपासूनच आडाखे बांधण्यास सुरुवात होईल. नागरिकांचा मागास प्रवर्ग 18, खुला 20, खुला महिला 19, अनुसूचित जाती 4, अनुसूचित जाती महिला 6, अनुसूचित जमाती 1 असे गटनिहाय आरक्षण निश्चित झालं आहे. पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी आरक्षण सोडत देखील निघाली.
शाहुवाडी तालुका
१. शित्तूर तर्फ वारूण - खुला
२. सरूड ओबीसी (नागरीकांचा मागास प्रवर्ग)
३. बांबवडे ओबीसी (नागरीकांचा मागास प्रवर्ग)
४. आंबार्डे - खुला (महिला)
पन्हाळा तालुका
५. सातवे - खुला
६. कोडोली - खुला
७. पोर्ले तर्फ ठाणे - खुला
८. यवलूज - खुला (महिला)
९. कोतोली- ओबीसी (महिला)
१०. कळे ओबीसी (महिला)
हातकणंगले तालुका
११. घुणकी ओबीसी (महिला)
१२. भादोले- अनुसुचित जाती (महिला)
१३. कुंभोज खुला (महिला)
१४. आळते - अनुसुचित जाती (महिला)
१५. शिरोली पुलाची - ओबीसी
१६. रूकडी- अनुसुचित जाती
१७. रूई - अनुसुचित जाती
१८. कोरोची- खुला (महिला)
१९. कबनूर - अनुसुचित जाती
२०. पट्टणकोडोली - अनुसुचित जाती
२१. रेंदाळ - खुला
शिरोळ तालुका
२२. दानोळी अनुसुचित जाती (महिला)
२३. उदगांव ओबीसी
२४. आलास - खुला
२५. नांदणी - अनुसुचित जमाती (महिला)
२६. यड्राव - ओबीसी (महिला)
२७. अब्दूललाट - अनुसुचित जाती (महिला)
२८. दत्तवाड - खुला (महिला)
कागल तालुका
२९. कसबा सांगाव अनुसुचित जाती (महिला)
३०. सिद्धनेर्ली - ओबीसी (महिला)
३१. बोरवडे- खुला (महिला)
३२. म्हाकवे - ओबीसी
३३. चिखली खुला (महिला)
३४. कापशी ओबीसी (महिला)
करवीर तालुका
३५. शिये ओबीसी
३६. वडणगे - खुला
३७. उचगांव - खुला
३८. मुडशिंगी - ओबीसी
३९. गोकुळ शिरगांव- खुला
४०. पाचगांव - खुला
४१. कळंबे तर्फ ठाणे- खुला (महिला)
४२. पाडळी खुर्द- खुला
४३. शिंगणापूर - खुला (महिला)
४४. सांगरूळ खुला (महिला)
४५. सडोली खालसा खुला
४६. निगवे खालसा खुला
गगनबावडा तालुका
४७. तिसंगी खुला (महिला)
४८. असळज खुला
राधानगरी तालुका
४९. राशिवडे बुद्रुक - खुला
५०. कसबा तारळे - खुला (महिला)
५१. कसबा वाळवे ओबीसी
५२. सरवडे - खुला (महिला)
५३. राधानगरी - खुला
भुदरगड तालुका
५४. गारगोटी खुला (महिला)
५५. पिंपळगांव खुला (महिला)
५६. आकुर्डे ओबीसी (महिला)
५७. कडगांव खुला (महिला)
आजरा तालुका
५८. उत्तर- खुला
५९. पेरणोली - खुला
गडहिंग्लज तालुका
६०. कसबा नूल - ओबीसी
६१. हलकर्णी - खुला
६२. भडगाव - खुला
६३. गिजवणे (खुला महिला)
६४. नेसरी खुला
चंदगड तालुका
६५. आडकूर (खुला महिला)
६६. माणंगाव - ओबीसी महिला
६७. कुदनूर - खुला (महिला)
६८. तुडये (ओबीसी महिला)
पंचायत समितीच्या सभापती आरक्षण
- सांगरूळ- पुरूष अनूसुचित जाती
- हातकंणगले-अनुसुचित जाती महिला
- कागल-महिला
- चंदगड-पुरूष
- आजरा-महिला
- ग. बावडा-महिला
- शाहूवाडी-महिला
- शिरोळ-पुरूष
- पन्हाळा :पुरूष
- भुदरगड-महिला
- राधानगरी-पुरूष
- गडहिंग्लज-पुरूष
इतर महत्वाच्या बातम्या
























