Panchganga River Pollution : कोल्हापूरपासून ते शिरोळ तालुक्यापर्यंत पंचगंगेच्या पात्रात माशांचा तडफडून मृत्यू सुरुच ,नदी प्रदुषित करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी
Panchganga River Pollution : प्रदुषित पाणी मिसळत असल्याने गटारगंगा झालेल्या पंचगंगेत जलचरांचा तडफडून मृत्यू सुरुच आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
![Panchganga River Pollution : कोल्हापूरपासून ते शिरोळ तालुक्यापर्यंत पंचगंगेच्या पात्रात माशांचा तडफडून मृत्यू सुरुच ,नदी प्रदुषित करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी Kolhapur to Shirol taluka the death of fish continues in Panchganga river Kolhapur shirol terwad rajaram bandhara Panchganga River Pollution : कोल्हापूरपासून ते शिरोळ तालुक्यापर्यंत पंचगंगेच्या पात्रात माशांचा तडफडून मृत्यू सुरुच ,नदी प्रदुषित करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/3d1e1b95a54a2cc349b7e54701a48ede1673248063962444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Panchganga River Pollution : प्रदुषित पाणी मिसळत असल्याने गटारगंगा झालेल्या पंचगंगेत गेल्या आठवडाभरातून जलचरांचा तडफडून मृत्यू सुरुच आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पोकळ आश्वासने, प्रदुषणमुक्तीची गुलाबी स्वप्ने, कारखान्यांकडून सांडपाणी थेट पाण्यात सोडले जात असल्याने नदीच्या पाण्यात अक्षरश: विष तयार होत आहे. पाण्यातील ऑक्सिनचा अंश कमी होत चालल्याने लाखो मासे तडफडून मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे परिस्थिती भयावह झाली आहे. कोल्हापूर शहरातून वाहणाऱ्या पंचगंगेच्या नदीपात्रात (Panchganga River Pollution) मृत माशांचा खच पडत असतानाच आता शिरोळ तालुक्यातही तीच भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. तेरवाड बंधाऱ्याजवळ लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे नदीच्या प्रदुषणाचा स्तर किती महाभयंकर झाला आहे, याचा अंदाज येतो.
वळिवडेत मृत माशांची दुर्गंधी
दुसरीकडे, वळिवडेत (ता. करवीर) पंचगंगेच्या पात्रात मृत माशांच्या खच पडल्याने आता दुर्गंधी पसरु लागली आहे. दुर्गंधीने हैराण झाल्याने ग्रामस्थांचा पारा चांगलाच चढला आहे. दरवर्षी होत असलेल्या या प्रकाराने (Panchganga River Pollution) संतापात भर पडत चालली आहे. नदी प्रदुषित करणाऱ्या संबंधितांवर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून नदीपात्रात मृत मासे तरंगत आहेत.
मृत मासे काढण्याची मोहीम सुरू
लाखभर मासे मृत झाल्याने गांधीनगर ग्रामपंचायतीकडून मृत मासे काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या सहकार्याने वळिवडे येथील सुर्वे बंधारा येथे मासे काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
नदी हिरवीगार झाल्याने पाण्याला प्रचंड दुर्गंधी
नदीच्या पाण्यातील ऑक्सिजन संपत चालल्याने शेकडो जलचरांचा (Panchganga River Pollution) तडफडून मृत्यू होत आहे. शिये-कसबा बावडा मार्गावर पंचगंगा नदी पुलाखाली पात्रात शेकडो माशांचा ऑक्सिजन न मिळाल्याने पाच दिवसांपूर्वी तडफडून मृत्यू झाला. नदी पात्रातील पाणी प्रदूषणात सातत्याने वाढ होत असल्याने मासे मृत होत आहेत. नदी सुद्धा हिरवीगार पडल्याने दुर्गंधीयुक्त पाण्यात शेकडो मासे पाण्यावर येत आहेत. नदीची गटारगंगा होत असतानाही कोणीही दखल घेतलेली नाही. मृत मासे पाण्यावर तरंगण्याचा तसेच ऑक्सिजनसाठी (Panchganga River Pollution) माशांनी पाण्यावर येण्याचा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून होत आहे. पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याने शेकडो मासे पाण्यावर अनेकजण पकडत होते.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)