Chhatrapati Shahu Maharaj Terminus : कोल्हापूर-पुणे आणि कोल्हापूर-सातारा पॅसेंजर महिनाभर रद्द; हरिप्रिया एक्स्प्रेसही आठ दिवस बेळगावमधून सुटणार
Kolhapur News : सातारा ते कोरेगाव रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी कोल्हापूर-पुणे व कोल्हापूर-सातारा पॅसेंजर महिनाभरासाठी (Chhatrapati Shahu Maharaj Terminus) रद्द करण्यात आल्या आहेत.
Kolhapur Latest News Update : सातारा ते कोरेगाव रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी कोल्हापूर-पुणे व कोल्हापूर-सातारा पॅसेंजर महिनाभरासाठी (Chhatrapati Shahu Maharaj Terminus) रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेसही (kolhapur tirupati haripriya express) आजपासून (दि. 5) आठ दिवस बेळगावमधून सुटणार आहे. पॅसेंजर व एक्सप्रेस गाड्या इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी बंद न ठेवता या गाड्या कोल्हापूर ते कऱ्हाडपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापकांकडे केली आहे.
कोल्हापूर-पुणे (Kolhapur to pune) व कोल्हापूर-सातारा (kolhapur to satara) या दोन्ही पॅसेंजर 2 मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. पॅसेंजर रद्द झाल्याने मिरजेहून कोल्हापूरकडे येणार्या प्रवाशांना पहाटेपासून साडे पाच ते सकाळी पावणे अकरापर्यंत एकही ट्रेन उपलब्ध नसेल. यामुळे प्रवाशांना पहाटे 5 वाजून 40 मिनिटांनी येणारी महालक्ष्मी किंवा 10 वाजून 45 मिनिटांनी सुटणार्या महाराष्ट्र एक्स्प्रेसने कोल्हापूरला यावे लागणार आहे. दुहेरीकरणाच्या कामासाठी 2 मार्चपर्यंत कोल्हापूर-पुणे व पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. यापूर्वीच 26 जानेवारीपासून बंद केलेल्या सातारा-पुणे व पुणे-सातारा पॅसेंजर 2 मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास होणार
दरम्यान, अमृत भारत योजनेचा भाग म्हणून (amrut bharat station yojana) पुनर्विकास करण्यात येणाऱ्या स्थानकांच्या यादीत कोल्हापूर, मिरज, सांगली आणि सातारा या रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी 2.41 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये सुमारे 2,800 किमी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्यमान रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण आणि नवीन रेल्वे लाईन टाकणे यांचा समावेश आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत (amrut bharat station yojana) देशभरातील 1,275 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. पुनर्विकासांतर्गत मिरज स्थानक व फलाटांची सुधारणा, सर्व फलाटांची लांबी, रुंदी व उंची वाढविणे, पिट लाइनचे रखडलेले काम सुरू करणे, टाकणे आदी कामे करण्यात येणार आहेत.
कोण कोणत्या स्थानकांचा पुनर्विकास होणार
पुणे रेल्वे विभागांतर्गत मिरज, पुणे, कोल्हापूर, सातारा, चिंचवड, सांगली, कराड, हडपसर, बारामती, लोणंद, आकुर्डी, तळेगाव, हातकणंगले, वाठार, देहूरोड, उरळी, केडगाव आणि शिवाजीनगर रेल्वे स्थानकांचा अमृत भारत योजनेत (amrut bharat station yojana) समावेश करण्यात आला आहे. या स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या