एक्स्प्लोर

Kolhapur Crime : कुख्यात जर्मनी टोळीच्या म्होरक्यासह दोघांकडून पोलिस कोठडीत विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न; इचलकरंजीत खळबळ

अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या जर्मनी टोळीचा म्होरक्या आनंद्या उर्फ आनंदा जर्मनी आणि याच गुन्ह्यात  अटक करण्यात आलेल्या अक्षयने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

कोल्हापूर : धाक दाखवून व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणी अटकेत असलेल्या कुख्यात जर्मन टोळीतील विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस कोठडीत असताना आरोपींकडे विष कोणाकडून आले आणि ते पोहोचले तरी कसे? असा प्रश्न असा उपस्थित झाला आहे. पोलीस कोठडीतील जर्मनी टोळीचा म्होरक्या आनंद्या उर्फ आनंदा जर्मनी आणि अक्षय कोंडूगळे या दोघांनी पोलिस ठाण्यामध्ये विषप्राशन केले. दोघांनाही उपचारासाठी प्रथम तत्काळ आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांनी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. विषप्राशन केल्याचे समजताच गुंडाच्या नातेवाईकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. 

अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या जर्मनी टोळीचा म्होरक्या आनंद्या उर्फ आनंदा जर्मनी आणि याच गुन्ह्यात  अटक करण्यात आलेल्या अक्षयने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही आरोपींनी दीड महिन्यांपूर्वी सरदार मुजावर या व्यावसायिकातचे अपहरण करून खंडणी मागितली होती. आरोपी आनंदा जर्मने व अक्षय कोंडूगळे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर केले होते. सध्या ते पोलिस कोठडीत होते. आज त्यांची मुदत संपत असतानाच त्यांनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपींवर 'मोक्का' अन्वये कारवाई करण्यात आली आहे. 

जर्मनी टोळीतील 15 जणांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा 

दरम्यान, जर्मनी सरदार मुजावर यांचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांच्याकडून 4 लाखांची रोकड व सोन्याचे दागिने असा 11.35 लाखाचा मुद्देमाल बळजबरीने काढून घेत खंडणी मागितली होती. यानंतर जर्मनी टोळीतील 15 जणांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

गेल्या महिन्यात सावकार अपहरण, दरोडा प्रकरणातील मुख्य म्होरक्या आनंदा जर्मनी याच्या नावाची दहशत माजवून जर्मनी गँगने हॉटेलवर दरोडा घातला होता. भरदिवसा रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह सहा जणांनी चाकूचा धाक दाखवून हॉटेल चालकाला मारहाण करत 7 हजार रुपये काढून घेत पसार झाले होते. या प्रकारानंतर त्याठिकाणीच दारूच्या नशेत पडलेल्या गँगमधील जखमी आरोपीला आयजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर हा दरोडा त्यांनीच घातल्याचे स्पष्ट झाले होते. बजरंग फातले, शुभम पट्टणकोडे, अमर शिंगे, लोखंडेसह सहा जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतची फिर्याद हॉटेल व्यावसायिक उमेश मदन म्हेत्रे यांनी दिली होती.

जर्मनी टोळीकडून गुन्ह्याची मालिका

जर्मन टोळी म्हणजे केवळ एकच टोळी नसून 30 ते 35 मुले वेगवेगळ्या गटाने गुन्हे करत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत यातील पाच गटांना ‘मोका’ लावण्यात आला आहे. अनेक गुन्हेगार तीन ते चार वर्षे जेलमध्ये आहेत. मात्र, जेलमधून जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा बाहेरच्या गुन्हेगारांबरोबर गुन्हे करतात. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP MajhaSpecial Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget