एक्स्प्लोर

Kolhapur Crime : आजीसमोर नातीचा विहिरीत पडून मृत्यू; झाडाला बांधलेली म्हैस अचानक फिरल्याने घडली दुर्घटना

Kolhapur Crime : विहिरीतून पाणी काढत असताना शेजारीच बांधलेल्या म्हशीचा अचानक धक्का लागल्याने आजीसमोर नातीचा बुडून मृत्यू झाल्याची भीषण दुर्घटना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात घडली.

Kolhapur Crime : विहिरीतून पाणी काढत असताना शेजारीच बांधलेल्या म्हशीचा अचानक धक्का लागल्याने आजीसमोर नातीचा बुडून मृत्यू झाल्याची भीषण दुर्घटना कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) आजरा तालुक्यात घडली. अवघ्या 14 वर्षीय अशाप्रकारे अंत झाल्याने आजीच्या विहिरीवर हंबरडा फोडला. कार्तिकीच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. आजरा शहरातील भारत नगरमधील कार्तिकी सचिन सुतार (वय 14) या शालेय विद्यार्थिनीचा माद्याळकर यांच्या शेतातील विहिरीत पडून बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (12 मार्च) चार वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची वर्दी आजरा पोलिसात देण्यात आली आहे. 

नेमका प्रसंग काय घडला?

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार कार्तिकी आजीसह शेतातील विहिरीतील पाणी काढून म्हैस धुवत होती. सोबत असलेली आजी बाजूला शेतात शेळ्या चारत होती. यावेळी शेजारीच असलेल्या झाडाला बांधलेली म्हैस अचानक फिरल्याने कार्तिकी थेट विहिरीत जाऊन कोसळली. ही घटना आजीच्या डोळ्यासमोर झाली. नात पडताच आजीने आरडाओरड सुरु केला, पण शेतामध्ये कोणीच नव्हते. काही वेळानंतर आजूबाजूचे नागरिक त्या ठिकाणी आले. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. त्यांनी विहिरीतील मृतदेह बाहेर काढून आजरा पोलिसांना माहिती दिली. 

वारकरी वृद्धाचा होरपळून करुण अंत

दरम्यान, आजरा तालुक्यात चिमणेत शेतातील आग विझवताना पाय घसरुन पडल्याने वारकरी वृद्धाचा होरपळून करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (8 मार्च) घडली होती. विठोबा भिमराव नादवडेकर (वय 83 वर्षे) असं वृद्धाचं नाव आहे. शेतामध्ये पाला एकत्र करून जाळण्यासाठी विठोबा नादवडेकर शेतात बुधवारी (8 मार्च) गेले होते. पाला गोळा करुन झाल्यानंतर त्यांनी तो पेटवून दिला. मात्र, रणरणत्या उन्हामुळे आणि वाऱ्यामुळे पाला पेटवल्यावर आगीने रौद्ररुप धारण केले. भेदरलरेल्या नादवडेकर आग इतरत्र पसरेल म्हणून आग विझवण्यासाठी धडपड करु लागले. मात्र, आग विझवण्याच्या प्रयत्नात दिव्यांग असल्याने त्यांची आग विझवताना ते पाय घसरुन पडले. पडल्याने त्यांच्या कपड्यांना आग लागली आणि त्यांचा जागीच होरपळून दुर्देवी मृत्यू झाला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: दारुड्या मुलाला संपवलं, बापाने रचला अपघाताचा बनाव; कोल्हापूर पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेने प्लॅन फसला, डाव उलगडला
दारुड्या मुलाला संपवलं, बापाने रचला अपघाताचा बनाव; कोल्हापूर पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेने प्लॅन फसला, डाव उलगडला
कोल्हापुरात व्याजानं पैसे देण्याच्या बहाण्याने खासगी सावकाराचा महिलेवर अत्याचार; आरोपीच्या मोबाईलमध्ये 200 ते 300 अश्लील व्हिडिओ असल्याचा सनसनाटी दावा
कोल्हापुरात व्याजानं पैसे देण्याच्या बहाण्याने खासगी सावकाराचा महिलेवर अत्याचार; आरोपीच्या मोबाईलमध्ये 200 ते 300 अश्लील व्हिडिओ असल्याचा सनसनाटी दावा
Gokul Election: गोकुळमध्ये भाजप सोडून मित्रपक्षाच्या पॅनेलसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्या, राष्ट्रवादीची मुश्रीफांकडे मागणी; भाजप, शिवसेना सोडून आणि कोणी मित्र आहेत का? भाजपचा खोचक सवाल!
गोकुळमध्ये भाजप सोडून मित्रपक्षाच्या पॅनेलसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्या, राष्ट्रवादीची मुश्रीफांकडे मागणी; भाजप, शिवसेना सोडून आणि कोणी मित्र आहेत का? भाजपचा खोचक सवाल!
Devendra Fadnavis and Krishnaraaj Mahadik: फडणवीस साहेब, तुम्ही माझं नालंदा विद्यापीठ आहात, तुमच्यासोबत राहिलो तर मला कोणीही अडवू शकत नाही: कृष्णराज महाडिक
फडणवीस साहेब, तुम्ही माझं नालंदा विद्यापीठ आहात, तुमच्यासोबत राहिलो तर मला कोणीही अडवू शकत नाही: कृष्णराज महाडिक

व्हिडीओ

Amol Mitkari On Murlidhar Mohol :ब्लॅक बॉक्स कुठे? विमानाचा CCTV कुठे? मोहोळांनी माफी मागावी-मिटकरी
Nashik TCS Case : निर्लज्जपणाचा कहर नराधमांच्या हाती पदर Special Report
Sanjay Dutt Movie : काँग्रेसच्या भुमिकेमुळे संजय दत्तच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Special Report
Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 6 जागा, इच्छूकांची फिल्डिंग, ही 12 नावं रेसमध्ये, कोणाला उमेदवारी मिळणार
US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IRGC seized vessel : मोठी बातमी, भारताकडे येणारं जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, IRGC ची कारवाई, जहाज इराणकडे घेऊन गेले  
मोठी बातमी, भारताकडे येणारं जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, IRGC ची कारवाई 
हिरे, दागिने, प्रायव्हेट जेट, 52 लाखांचा अरबी घोडा ते आलिशान गिफ्ट दिल्या त्याच जॅकलिन फर्नांडिसचा आता सुकेशविरोधात एल्गार! कोर्टात अर्ज देताच सुकेशच्या चिट्टीतील फक्त 7 शब्दांनी लक्ष वेधलं!
हिरे, दागिने, प्रायव्हेट जेट, 52 लाखांचा अरबी घोडा ते आलिशान गिफ्ट दिल्या त्याच जॅकलिन फर्नांडिसचा आता सुकेशविरोधात एल्गार! कोर्टात अर्ज देताच सुकेशच्या चिट्टीतील फक्त 7 शब्दांनी लक्ष वेधलं!
करुणा शर्मांनी पतीराजाला विचारुन फॉर्म भरला, ही भानगड काय? बारामती पोटनिवडणुकीवरुन बजरंग सोनवणेंचा सवाल
करुणा शर्मांनी पतीराजाला विचारुन फॉर्म भरला, ही भानगड काय? बारामती पोटनिवडणुकीवरुन बजरंग सोनवणेंचा सवाल
नेपाळचे माजी गृहमंत्री जेलमध्ये असतानाच थेट विद्यमान गृहमंत्र्यांचा राजीनामा पडला! असं नेमकं घडलं तरी काय? अवघ्या 25 दिवसांपूर्वीच नव्या सरकारमध्ये शपथविधी
नेपाळचे माजी गृहमंत्री जेलमध्ये असतानाच थेट विद्यमान गृहमंत्र्यांचा राजीनामा पडला! असं नेमकं घडलं तरी काय? अवघ्या 25 दिवसांपूर्वीच नव्या सरकारमध्ये शपथविधी
RBI : ऑटो डेबिटपूर्वी खातेदारांना माहिती देणं आवश्यक, बँकांच्या मनमानीवर आरबीआयच्या नव्या नियमानं चाप, 24 तासांअगोदर माहिती द्यावी लागणार
ऑटो डेबिटपूर्वी खातेदारांना माहिती देणं आवश्यक, बँकांच्या मनमानीवर आरबीआयच्या नव्या नियमानं चाप
Chhatrapati Sambhajinagar: घरात घुसली, आतून कडी लावली; महिलेचा सासू सुनेला संपवण्याचा प्रयत्न, डोक्यावर पिस्तुल रोखलं अन्... घटनेनं संभाजीनगर हादरलं
घरात घुसली, आतून कडी लावली; महिलेचा सासू सुनेला संपवण्याचा प्रयत्न, डोक्यावर पिस्तुल रोखलं अन्... घटनेनं संभाजीनगर हादरलं
बाई नाही, तर लेकराची आई कडाडली; वाहतूक कोंडीने एवढं का संतापली महिला, मंत्र्यांनाही सुनावलं, नेमकं कारण काय?
बाई नाही, तर लेकराची आई कडाडली; वाहतूक कोंडीने एवढं का संतापली महिला, मंत्र्यांनाही सुनावलं, नेमकं कारण काय?
मामाच्या घरी भाचीकडून डल्ला, सोन्याचे दागिने पळवले; पोलिसांनी शौचालयातून काढले, असा केला उलगडा
मामाच्या घरी भाचीकडून डल्ला, सोन्याचे दागिने पळवले; पोलिसांनी शौचालयातून काढले, असा केला उलगडा
Embed widget