एक्स्प्लोर

KDCC ED Raid : तब्बल 30 तास चौकशी अन् पाच अधिकारी ताब्यात; कोल्हापूर जिल्हा बँकेच्या ईडी छापेमारीत आतापर्यंत काय घडलं?

कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय, त्यांच्याशी निगडीत संस्थांवर ईडीची छापेमारी (Hasan Mushrif ED Raid) सुरुच आहे.

KDCC ED Raid : कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय तसेच त्यांच्याशी निगडीत संस्थांवर ईडीची छापेमारी (Hasan Mushrif ED Raid) सुरुच आहे. 11 जानेवारी रोजी केलेल्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (KDCC ED Raid) शाहूपुरी येथील मुख्य कार्यालय, कागल तालुक्यातील सेनापती कापशी तसेच गहहिंग्लज तालुक्यातील हरळी जिल्हा बँकेच्या शाखेत, तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना या ठिकाणी तब्बल 30 तास छापेमारी केली. 

बुधवारी (1 फेब्रुवारी) ईडीच्या पथकाने सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत असा 12 तासांहून अधिक काळ तिन्ही कार्यालयात (KDCC ED Raid)  ठाण मांडून चौकशी केली होती, या पथकात स्थानिक दोन बँक अधिकाऱ्यांसह एकूण आठ अधिकाऱ्यांच्या समावेश होता. रात्री 10 नंतर एकूण 22 अधिकाऱ्यांनी बँकेचे अध्यक्ष अध्यक्ष मुश्रीफ तसेच उपाध्यक्ष राजू आवळे यांच्या दालनातील कागदपत्रांची तपासणी केली. 

सरसेनापती संताजी घोरपडे, ब्रिक्स, बिद्री व भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारांबाबत चौकशी झाल्याची माहिती आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून कर्ज प्रकरणाबाबत माहिती घेऊन चौकशी करण्यात आली. कापशी शाखेतील सर्व शेतकरी ठेव पावत्यांची झेरॉक्स प्रत घेतल्याची माहिती आहे. 

दुसऱ्या दिवशीच्या छापेमारीत पाच अधिकारी ताब्यात 

दरम्यान, गुरुवारी (2 फेब्रुवारी) सुद्धा ईडीची कारवाई सुरु राहिली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (KDCC ED raid) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्यासह मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांना ईडीच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यांना पोलीस बंदोबस्तात मुंबईला नेण्यात आलं आहे. ईडीने तब्बल 30 तास ब्रिक्स व संताजी घोरपडे साखर कारखान्याची संबंधित सर्व व्यवहारांची कसून चौकशी केली. गुरुवारी सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी माने, पत देखरेख विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, सहाय्यक व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, निरीक्षक सचिन डोणकर आणि राजू खाडे यांना समाज बजावून ईडीच्या पथकाने ताब्यात घेतले. 

जनसंपर्क अधिकारी आणि मुश्रीफांच्या स्वीय सहाय्यकांची सुद्धा चौकशी

दरम्यान, बुधवारी रात्री बँकेचे (KDCC ED Raid) जनसंपर्क अधिकारी शिवाजी पाटील आणि अध्यक्ष मुश्रीफ यांचे स्वीय सहाय्यक सुभाष पाटील यांचीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. कागदपत्रांच्या झेरॉक्स ताब्यात घेण्यात आले आहेत. ब्रिक्स व संताजी घोरपडे सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर जिल्हा बँकेमध्ये झालेल्या व्यवहार आणि त्या संबंधित कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत. जिल्हा बँकेची तरलताही तपासल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल 30 तास सलग चौकशी झाल्याने बँक अधिकारांच्या डोळ्यावर तणाव स्पष्टपणे दिसत होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget