एक्स्प्लोर

Hatkanangle Lok Sabha constituency : हातकणंगले लोकसभेला 'खेला होबे'! धैर्यशील मानेंना पर्याय म्हणून महायुतीमधून मोठं नाव समोर

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkanangle Lok Sabha constituency) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकला चलो रे ची भूमिका अजूनही कायम ठेवली आहे.

कोल्हापूर : शिवसेना शिंदे गटाने कोल्हापूरमध्ये महाधिवेशन घेत कोल्हापूरच्या दोन्ही जागांवर दावा केला असला, तरी हातकणंगले लोकसभेची (Hatkanangle Lok Sabha constituency) अजूनही चर्चा सुरूच आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या विरोधातील अंतर्गत यादवी आणि त्यांना मतदारसंघात होत असलेल्या विरोध तसेच मतदारसंघातून गायब झाल्याच्या तक्रारीमुळे महायुतीकडून पर्यायी उमेदवार शोधण्यास सुरुवात झाली आहे. 

महायुतीकडून आमदार विनय कोरे यांच्या नावाची चर्चा सुरू

गेल्या काही दिवसांपासून जी पडद्यामागून चर्चा सुरु होती त्यामध्ये जाहीर नाव समोर आलं आहे. महायुतीकडून आमदार विनय कोरे (MLA Vinay Kore) यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याची विश्वासनीय माहिती समोर आली आहे. विनय कोरे यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली असून ऐनवेळी ते महायुतीचा उमेदवार होऊ शकतात, अशी चर्चा आहे.  

राजू शेट्टींची एकला चलो रे ची भूमिका कायम

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkanangle Lok Sabha constituency) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकला चलो रे ची भूमिका अजूनही कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर उमेदवार कोण हे निश्चित नाही. धैर्यशील माने हेच उमेदवार असतील असं सातत्याने सांगण्यात येत असलं तरी माने यांच्या विरोधातील वाढती नाराजी प्रचंड असल्याने महायुती कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता पर्यायी उमेदवाराचा विचार सुरु केला आहे.  

वारणा खोऱ्यात विनय कोरेंची ताकद 

दुसरीकडे विनय कोरे यांचं नाव पुढे येण्यात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील बेरजेचा राजकारणाचाही भाग आहे. ते स्वतः पन्हाळा शाहूवाडीचे आमदार आहेत. 2019 मध्ये विनय कोरे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. वारणा खोऱ्यामध्ये वारणा उद्योग समुहाच्या माध्यमातून सहकाराचं जाळं तयार केलं आहे. राजाराम कारखान्याची परतफेड म्हणून महाडिक गटाकडून त्यांना मदत होऊ शकते. महाडिक गटाची हातकणंगले आणि शिराामध्येही ताकद आहे. हातकणंगलेत विद्यमान चार आमदार महायुतीमधील असल्यानेही सुद्धा फरक पडू शकतो. इतकंच नव्हे, तर माने यांनी विनय कोरे यांची सुद्धा नाराजी ओढवून घेतली आहे. त्यामुळे मतदारसंघातील आडाखा पाहता धैर्यशील माने सध्या अडचणीत असल्याचे बोलले जात आहे. 

दुसरीकडे धैर्यशील माने यांना बंडखोरीचा दणका देण्यासाठी शिवसेना ठाकरे गट ही जागा आपल्याकडे ठेवून उमेदवार न देता राजू शेट्टी यांचा मार्ग प्रशस्त करून देईल, अशी चर्चा आहे. बदल्यात शेट्टी यांची मदत विधानसभेला घेतली जाऊ शकते.  त्यामुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये ऐनवेळी शेट्टी यांच्याविरोधात उमेदवार बदलल्यास राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra Politics

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
Embed widget