Amit Shah In Kolhapur : "अमित शाह यांच्या मेळाव्याने कोल्हापूर, हातकणंगलेत लोकसभा विजयी संकल्पाची नांदी होणार; कार्यकर्त्यांनी कामाला लागावे"
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 19 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी केले.
Amit Shah In Kolhapur : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने एक वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 19 फेब्रुवारी रोजी (Amit Shah Kolhapur visit) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी केले. कोल्हापुरातील बालाजी गार्डनमध्ये आयोजित कोल्हापूर (kolhapur News) व हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हळवणकर, अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख उपस्थित होते.
भाजपने महाराष्ट्रातील 18 लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या दृष्टीने लोकसभा प्रवास योजनेत समाविष्ट केले आहेत. या प्रवास योजनेच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर हातकलंगले आणि कोल्हापूरची जबाबदारी दिली आहे. देशातील काही प्रमुख नेतेही या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत निवडलेल्या मतदारसंघांचा प्रवास करणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे. यानुसार 19 फेब्रुवारी रोजी अमित शाह यांचा कोल्हापूर दौऱ्याचा कार्यक्रम आहे. या दौऱ्यात ते भाजपने नव्याने बांधलेल्या कार्यालयासमोर गणेश मंदिराचे भूमिपूजन करतील. त्यानंतर पक्षाच्या शक्ती केंद्र बूथ आणि पदाधिकाऱ्यांचा मेळाव्याला संबोधित करतील. रात्री आठ वाजता हॉटेल पॅव्हेलियन या ठिकाणी 12 विधानसभा मतदारसंघांच्या कोअर टीमबरोबर बैठक करतील, असा हा कार्यक्रम आहे. या दौऱ्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, हिंदुराव शेळके, महिला आघाडीच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, गायत्री राऊत, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, गणेश देसाई, हेमंत आराध्ये, अशोकराव माने, अनिल यादव, राहुल देसाई, अल्केश कांदळकर, प्रवीण सावंत, डॉक्टर सुभाष जाधव, सम्राट महाडिक, राहूल महाडिक, संजय पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व टीम उपस्थित होते.
अमित शाह 19 फेब्रुवारीला कोल्हापूर दौऱ्यावर
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 19 फेब्रुवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. शाह दोनदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून 18 फेब्रुवारीला ते नागपूर आणि पुण्यामध्ये असतील. कोल्हापुरात न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. न्यू एज्युकेशन सोसायटी प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलसह अनेक शाळा आणि महाविद्यालये चालवते. शाह यांच्या पत्नी सोनल शाह सुमारे 40 वर्षांपूर्वी याच शाळेच्या विद्यार्थिनी होत्या.
इतर महत्वाच्या बातम्या