एक्स्प्लोर

Kolhapur News : कुष्ठरुग्ण शोध मोहीम व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम प्रभावीपणे राबवा, जिल्हाधिकाऱ्यांकडून सूचना

कुष्ठरुग्ण शोध मोहीम व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे, यासाठी आवश्यक ते नियोजन करुन ही मोहीम प्रभावीपणे राबवा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.

Kolhapur News : कुष्ठरुग्ण शोध मोहीम व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम जिल्ह्यात 13 ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान राबविण्यात येत असून यासाठी आवश्यक ते नियोजन करुन ही मोहीम प्रभावीपणे राबवा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. कुष्ठरोग व क्षयरोग जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, कुष्ठरोग विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ. हर्षला वेदक, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले की, क्षयरोग निर्मूलनाच्या शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे गतवर्षी कोल्हापूर ग्रामीणसाठी रौप्य पदक मिळाले असून यावर्षी सुवर्ण पदकासाठी नामांकन झाले आहे. यासाठी नवीन क्षयरुग्ण सापडण्याचे प्रमाण 2015 च्या तुलनेत 60 टक्क्यांनी कमी होणे आवश्यक आहे.  

यादृष्टीने सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिमेचा उपयोग होईल व कोल्हापूर जिल्हा क्षयमुक्त होण्यासाठी मदत होईल. सर्वांनी या मोहिमेत संशयितांची तपासणी करुन घेऊन निदान झालेल्या रुग्णांना वेळेत मोफत औषधोपचार द्यावेत, असे सांगून या मोहिमेत खासगी डॉक्टरांनाही सहभागी करुन घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिल्या.

या शोध मोहिमेसाठी एक आशा कार्यकर्ती किंवा स्त्री स्वयंसेविका व एक पुरुष स्वयंसेवक यांची एक याप्रमाणे 2 हजार 684 टीम स्थापन करण्यात आल्या असून याद्वारे त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील लोकांची गृहभेटीद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. याद्वारे समाजातील निदर्शनास न आलेले प्राथमिक अवस्थेतील कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण या आजाराचे रुग्ण शोधून औषधोपचार मिळवून देण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.

 2 हजार 684 टीममध्ये 5 हजार 374 सदस्य 14 दिवसांत सर्वेक्षण करणार

या अभियानाकरिता ग्रामीण भागासाठी निवडलेली लोकसंख्या 31 लाख 37 हजार 420

  • एकूण घरे 6 लाख 82 हजार 49
  • एकूण टीम 2 हजार 464
  • एकूण टीम सदस्य 4 हजार 935 
  • एकूण पर्यवेक्षक 495.

या अभियानासाठी शहरी भागासाठी निवडलेली लोकसंख्या 3 लाख 47 हजार 729

  • एकूण घरे 75 हजार 594
  • एकूण टीम- 219
  • एकूण टीम सदस्य 440 
  • एकूण पर्यवेक्षक 42.

अभियानासाठी एकूण निवडलेली लोकसंख्या- 34 लाख 85 हजार 149

  • एकूण घरे- 7 लाख 57 हजार 643
  • एकूण टीम- 2 हजार 684
  • एकूण टीम सदस्य 5 हजार 374
  • एकूण पर्यवेक्षक 537 

कुष्ठरोग लक्षणे कशी असतात? (What are the symptoms of leprosy)

  • त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टा, त्याठिकाणी घाम न येणे
  • जाड, बधीर तेलकट/चकाकणारी त्वचा
  • त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे
  • भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे
  • तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा अथवा जखमा असणे
  • हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासून किंवा पाय घोट्यापासून लुळा पडणे
  • त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे
  • हात व पायामध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातुन वस्तु गळून पडणे, चालताना पायातुन चप्पल गळून पडणे

क्षयरोग लक्षणे काय असतात? (What are the symptoms of tuberculosis)

  • दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा खोकला
  • दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा ताप
  • वजनात लक्षणीय घट
  • थुंकीवाटे रक्त येणे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा देण्याचे आदेश नाही दिले, मग आम्हाला वाटतं त्याला मत देऊ : संदीप देशपांडे
विधान परिषद निवडणुकीत मनसेचा महायुतीला पाठिंबा नाही? संदीप देशपांडेंच्या वक्तव्यानं चर्चांना जोर
Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्कLok Sabha Speaker Election : लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी यंदा निवडणूक, 'इंडिया'कडून के. सुरेश मैदानातABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 June 2024Niranjan Davkhare on Election : विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : डावखरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा देण्याचे आदेश नाही दिले, मग आम्हाला वाटतं त्याला मत देऊ : संदीप देशपांडे
विधान परिषद निवडणुकीत मनसेचा महायुतीला पाठिंबा नाही? संदीप देशपांडेंच्या वक्तव्यानं चर्चांना जोर
Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
Embed widget