kolhapur ZP Best Teacher Award : कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा
कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात येतात.
kolhapur ZP Best Teacher Award : कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी जिल्हा परिषदेकडून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात येतात. बारा शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार व एका शिक्षकाला विशेष पुरस्कार घोषित झाला आहे. पुरस्कार निवड पारदर्शक पद्धतीने व्हावी म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने यंदा सुयोग्य नियोजन केले.
जिल्हा परिषदेचे प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे जाहीर केली. पुरस्कार वितरण समारंभाची तारीख नंतर कळविण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून कळवण्यात आली आहे. तालुका व केंद्र पातळीवर प्रस्तावांची छाननी करुन प्रत्येक तालुक्यातून तीन शिक्षकांची आदर्श शिक्षकासाठी शिफारस करण्यात आली होती.या शिफारशीतून अंतिम केलेल्या शिक्षकांच्या गुरुवारी आणि शुक्रवारी जिल्हा परिषदेत मुलाखती झाल्या. मुलाखत घेऊन गुणांकन करण्यात आले.
प्रशासक संजयसिंह चव्हाण, शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य सुनीलकुमार लवटे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी आशा उबाळे, श्री महाराणी ताराराणी शासकीय अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सी.वाय. कांबळे,वाकरे येथील पी. एस. तोडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक बी.बी.पाटील यांनी मुलाखती घेतल्या.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक व शाळा
- मारुती पांडूरंग डेळेकर ( विद्या मंदिर किणे, ता. आजरा)
- सचिन बाजीराव भोसले व राजेंद्र पांडूरंग शिंदे (विद्यामंदिर दारवाड व आकुर्डे. ता. भुदरगड)
- प्रशांत मारुती पाटील (विद्यामंदिर सरोळी, ता. चंदगड)
- अर्चना शरद देसाई (विद्यामंदिर लिंगनूर कसबा नूल, ता, गडहिंग्लज)
- गीतांजली गणपतराव कमळकर( विद्यामंदिर भडगाव, ता. कागल)
- राजाराम श्रीपती नारींगकर (विद्यामंदिर तिटवे, ता. राधानगरी)
- विश्वास बंडू भोसले (विद्यामंदिर मांडुकली विद्यामंदिर, गगनबावडा )
- सुषमा दिलीप माने व महेश रामचंद्र बन्ने ( केंद्रशाळा भादोले व कन्या वाठारतर्फे वडगाव, हातकणंगले)
- दत्तात्रय दादू पाटील (विद्यामंदिर नागाव, ता. करवीर)
- मुख्याध्यापक तानाजी शिवराम धरपणकर (केंद्रशाळा पुनाळ, ता. पन्हाळा)
- शिवाजी केशव पाटील (विद्यामंदिर चरण, ता. शाहूवाडी)
- मुख्याध्यापिका अरुणा चंद्रकुमार शहापुरे (कुमार विद्याम्ंदिर बुबनाळ, ता. शिरोळ)
इतर महत्वाच्या बातम्या