एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काय आहे उन्नावचं बलात्कार प्रकरण, नेमकं काय घडलं?
पीडितेच्या कुटुंबाच्या दाव्यानुसार दोघांनी कोर्टात नोंदणी पद्धतीनं विवाह केला होता. अर्थात ही बाब कुटुंबाला माहिती नव्हती. काही दिवसांनी शिवम त्रिवेदीनं विवाह केल्याचं मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे दोन्ही कुटुंबात भांडणं झाली, शिवमच्या कुटुंबानं पीडितेच्या कुटुंबियांना धमकावलंही होतं.
नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु असताना हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला. हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणात झालेल्या एन्काउंटरवरुन देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत असतानाच या पीडितेचाही मृत्यू झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं घडलं काय?
उन्नावपासून 50 किलोमीटर अंतरावर हिंदूपूर गाव आहे. गावात मुख्य आरोपी शिवम त्रिवेदी आणि पीडित मुलगी अर्ध्या किलोमीटर अंतरावर राहतात. दोन्ही कुटुंबाचे दोन वर्षापूर्वीपर्यंत अत्यंत जवळचे संबंध होते. बऱ्याचदा पीडित मुलीच्या कुटुंबाला मदतही केली होती. शिवम आणि पीडित मुलीची हळूहळू मैत्री वाढली आणि दोघं प्रेमात पडले. पीडितेच्या कुटुंबाच्या दाव्यानुसार दोघांनी कोर्टात नोंदणी पद्धतीनं विवाह केला होता. अर्थात ही बाब कुटुंबाला माहिती नव्हती. काही दिवसांनी शिवम त्रिवेदीनं विवाह केल्याचं मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे दोन्ही कुटुंबात भांडणं झाली, शिवमच्या कुटुंबानं पीडितेच्या कुटुंबियांना धमकावलंही होतं.
अखेर गेल्या वर्षी 12 डिसेंबर 2018 ला पीडित मुलीनं शिवम आणि त्याचा मित्र अर्थात गावच्या सरपंच शांतीदेवी यांचा मुलगा शुभमनं बलात्कार केल्याचा आरोप केला. पीडितेनं 13 डिसेंबर 2018 ला स्थानिक पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नाही. 20 डिसेंबर 2018 ला पीडितेनं रजिस्टर्ड पोस्टानं आपली तक्रार रायबरेली पोलीस अधीक्षकांकडे पाठवली. मात्र काहीच झालं नाही.अखेर 4 मार्च 2019 ला रायबरेली कोर्टाच्या आदेशानं शिवम आणि शिवमवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
उन्नाव पीडितेची हृदयद्रावक कहाणी; न्यायासाठी जाताना घात
14 ऑगस्ट 2019 ला पोलिसांनी या दोन्ही आरोपींची संपत्ती जप्त करुन सील केली. 19 सप्टेबर 2019 ला शिवम त्रिवेदी कोर्टासमोर हजर झाला. 25 नोव्हेंबर 2019 ला हायकोर्टाने शिवमला जामीन दिला, पण या सगळ्या प्रकरणानंतरही शुभम मात्र फरारच होता. 5 डिसेंबरला कोर्टाच्या तारखेला रायबरेली जाण्यासाठी म्हणून पीडित तरुणी पहाटे 4 वाजता घरातून बाहेर पडली. तिच्या घरापासून रेल्वे स्टेशन 2 किलोमीटर अंतरावर आहे, रस्ता निर्जन आहे. पहिली ट्रेन पहाटे 5 वाजता असते.
पीडितेच्या दाव्यानुसार घरापासून काही अंतरावर असताना शिवम आणि शुभमनं दांडक्याने आणि चाकूने तिच्यावर हल्ला केला. ती जखमी होऊन खाली कोसळल्यानंतर तिच्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं. पहाटेची वेळ असल्याने फारसं कुणी जागं नव्हतं त्यामुळेच 1 किलोमीटर दूरवर गेल्यानंतर पीडितेला मदत मिळाली. तिला उन्नावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र ती 90 टक्के भाजली होती. त्यामुळे तिला तातडीनं लखनौच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं.तिची प्रकृती बिघडू लागल्याने 5 डिसेंबरला संध्याकाळी तिला एअरलिफ्ट करुन दिल्लीतील सफदरजंगमध्ये उपचारासाठी आणलं. मात्र काल रात्री 6 डिसेंबरला 11 वाजून 40 मिनिटांनी तिचा मृत्यू झाला.
संबंधित बातम्या -
उन्नावच्या निर्भयाची झुंज अपयशी, उपचारादरम्यान दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास
हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया म्हणतात..
Unnao Rape Case | उन्नावमधल्या बलात्कार पीडित तरुणीचा अखेर मृत्यू | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement