Nagpur Crime Stories : एका प्रेयसीची पुण्यात हत्या, दुसऱ्या प्रेयसीसाठी पोहोचला नागपुरात
किर्तीच्या खुनानंतर आशिष मुंबईला पळून गेला. किर्तीन आत्महत्या केल्याची बतावणी केली. नागपुरच्या प्रेयसीला मुंबईला बोलावले. नागपूरची तरुणीही मुंबई पोहोचली. नंतर दोघेही नागपुरला आले.
नागपूरः एकमेकांसोबत लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेमीयुगुलात भांडण झाले. त्यातून प्रेयसीचा खून (Murder of girlfriend) करून प्रियकर पसार झाला. दुसऱ्या प्रेयसीला घेऊन तो नागपुरात आला. याच्या मागावर असलेल्या पुणे पोलिसांनी याबाबत नागपूर पोलिसांना टीप दिली. सापळा रचून आरोपी व त्याच्या प्रेयसीला पोलिसांनी बोले पेट्रोलपंपाजवळून ताब्यात घेतले. यानंतर दोघांनाही पुणे पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले.
आशीष भोलसे (वय 20 रा. सासवड, पुरंदर, पुणे) असे प्रेयसीच्या मारेकऱ्याचे नाव आहे. तर किर्ती देढेकर (वय 20, रा. हिंजवड) असे मृत प्रेयसीचे नाव आहे. दोघेही पुण्यात लिव्ह इनमध्ये राहत होते. दरम्यान मूळची नागपुरच्या कोराडीत राहणाऱ्या युवतीसोबत त्याचे सूत जुळले. (love triangle) याच कारणावरून आशीष आणि किर्ती यांच्यात वाद सुरू झाला. 19 जुलैला आशिषने किर्तीचा गळा आवळून खून केला. ही घटना 20 जुलैला उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांनी गतीने तपासचक्र फिरवीत आरोपी आशिषचा शोध सुरू केला होता.
दोघांत तिसरीची एंट्री
मृतक किर्ती पुण्यातील हिंजवडमध्ये कपड्याच्या दुकानात कामाला होती. सुमारे दीड वर्षांपूर्वी तिथेच काम करणाऱ्या आशिषवर प्रेम जुडले. किर्तीच्या घरच्यांचा दोघांच्या लग्नाला विरोध होता. यामुळे 9 महिन्यांपूर्वीपासून दोघेही लिव्ह इन मध्ये राहू लागले होते. नागपुरच्या दुसऱ्या प्रेयसीची बहिणसुद्धा पुण्यातील एका कपड्याच्या शोरुममध्ये व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. तिने धाकड्या बहिणीला किर्ती व आशिष कार्यरत असलेल्या कपड्याच्या दुकानात नोकरी (Job in cloth shop) लावून दिली. दरम्यान, आशिष व नागपुरच्या युवतीमध्येही प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबत शंका निर्माण होताच किर्ती आणि आशिष यांच्यात टोकाचे भांडण झाले. त्यानंतर नागपुरची युवती घरी परतली.
आधी मुंबईला पळाला नंतर नागपुरात आला
किर्तीच्या खुनानंतर आशिष मुंबईला (Mumbai crime) पळून गेला. तिथून नागपूरच्या प्रेयसीला फोन केला. किर्तीन आत्महत्या केल्याची बतावणी केली. दोघांचेही लग्न करून सोबत राहण्याचे ठरले. आशिषने नागपुरच्या प्रेयसीला मुंबईला बोलावले. नागपूरची तरुणीही मुंबई पोहोचली. नंतर दोघेही नागपुरला (nagpur) आले. पुणे पोलिसांकडून सतत आरोपीच्या मोबाईल लोकेशनवर लक्ष ठेवून होते. त्याचे नागपुरातील लोकेशन मिळताच स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांना अटक करण्यात आली.