आमचं काहीतरी वेगळंच असतं... मराठी भाषेसाठी सोशल मीडियावर भन्नाट पेज, काय आहे "खलबत्ता"?
आजकाल अनेक संस्था, संघटना या मराठी भाषेसाठी बरेच उपक्रम राबवतात. मात्र आपल्या मराठी भाषेसाठी सोशल मीडियावर एक भन्नाट पेज सुरु केले आहे.
Marathi Bhasha : सोशल मीडियावर (Social Media) आजकाल प्रत्येक जण काही ना काही हटके कन्टेंट (Content) पोस्ट करत असतात. मात्र काही कल्पना या अशा असतात ज्याचा आपण विचारही करत नाही. असाच एक निराळा कन्टेंट सध्या इन्स्टाग्रामवर (Instagram) चांगलाच व्हायरल होत आहे. "खलबत्ता" या नावाने एका तरुणाने मराठी भाषेच्या प्रेमासाठी हे पेज काढले आहे. "खलबत्ता" (आमचं काहीतरी वेगळच असतं) हे नाव देत मराठी लोकांसाठी आणि मराठी भाषेवरील प्रेमापोटी एक हक्काचे व्यासपीठ पुण्यातील एका तरुण आणि तरुणीने सुरु केले आहे. मायबोली प्रेम करणारा प्रेक्षक वर्ग या पेजला चांगलीच पसंती देत आहे. या इन्स्टाग्राम पेजवर मराठी भाषेशी संबंधित अनेक पोस्ट आणि व्हिडीओज आहेत. ज्यात मराठी भाषेविषयी उपयुक्त माहिती आहे. सोबतच मनोरंजनात्मक व्हिडीओज आहेत. मराठी भाषेचा उगम कसा झाला पासून ते कोणता शब्द कसा उच्चाराला जावा यापर्यंत सर्व काही या आगळ्यावेगळ्या "खलबत्ता"मध्ये आहे.
View this post on Instagram
तसेच म्हणी, वाक्प्रचार नेमके आले कोठून, त्यांचा योग्य अर्थ काय? शब्दांचे उच्चार कसे करावेत. पत्र लिहिण्याचे साधारण नियम काय आहेत? ऱ्हस्व-दीर्घ कधी वापरले पाहिजे. मराठी भाषेत कधीच न वापरल्या जाणाऱ्या असंख्य शब्दाचे अर्थ आणि अजून बरेच काही या "खलबत्ता"मध्ये तुम्हाला अनुभवायाला मिळेल.
या सगळ्या माहितीपूर्ण पोस्ट आणि व्हिडीओज सोबतच आम्ही आणि जग, वाचाल तर वाचाल, महाचर्चा, पत्रास कारण की..., योग्य काय?, हे कोठून आले?, महत्वाची संकेतस्थळे, शब्द एक अर्थ अनेक, वर्णप्रकार थोड्या गप्पा, देव-बिव प्रदर्शन अशा पद्धतीच्या अनेक मजेशीर पण माहितीपूर्ण गोष्टी इथे होत असतात. विशेष म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वी चालू केलेले हे पेज थोड्याच काळात लोकांना कनेक्ट झाले आहे. प्रत्येक व्हिडीओला हजारांपेक्षा जास्त लाईक्स असून हे पोस्ट आणि व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर
शेअर केले जातात. या "खलबत्ता"मध्ये जे काही वाटले जातेय ते बाकी फारच मुद्देसूद आणि मजेशीर बाकी आहे हे मात्र खरे.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या
Palghar: डहाणू, तलासरीमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट