एक्स्प्लोर
Advertisement
जालना प्रकरण | आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी, वकील संघाकडून आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय
जालन्यात काल घडलेल्या घटनेनं महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. प्रेमीयुगलांना काही टारगट मुलांनी मारहाण केली. यावेळी मुलीसोबत अत्यंत विभत्स प्रकार घडला. हा प्रकार समोर आल्यानंतर समाजमन ढवळून निघालं.
जालना : जालन्यातील संतापजनक घटनेनंतर या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलं आहे. आज या सर्व आरोपींना जालना न्यायालयात दाखल करण्यात आलं. प्रेमी युगलाला मारहाण आणि मुलीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी जालना फौजदारी न्यायालयाकडून चार आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या प्रकरणातील एका अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या संतापजनक प्रकरणात जालना जिल्हा वकील संघाकडून आरोपीचे वकील पत्र न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जालन्यात घडलेल्या या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. या विनयभंग प्रकरणातील पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर अवघ्या दोन तासात पोलिसांनी कारवाई केली. आतीश अण्णा खंदारे, सुशील साहेबराव वाघ, कारभारी रामभाऊ वाघ, विशाल कुटे अशी आरोपींची नाव आहेत. ज्या आरोपीने हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला तो अल्पवयीन असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
माझा विशेष | मुलाला मुलगी भेटते...तुम्हाला का खुपते?
एका प्रेमी युगुलाला टोळक्याने मारहाण करुन मुलीचा विनयभंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. एकमेकांना भेटण्यासाठी आलेल्या या जोडप्याला मारहाण करतानाचा हा व्हिडिओ आहे. दोन मुलं या जोडप्याला बेदम मारहाण करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. एके ठिकाणी भेटायला आलेल्या मुला-मुलीला पाच टारगटांनी घेरलं आणि दमदाटी केली. "घरी कळवतो, फोन नं दे..." वगैरे भिती घालण्याचा प्रयत्न केला. मुलगा-मुलगी घायकुतीला आले. त्यांनी विनवण्याही केल्या. मात्र, त्या टारगटांनी हा सर्व प्रकार शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला. तर अन्य एक मुलगा मारहाणीची व्हिडीओ क्लिप रेकॉर्ड करत आहे. हा व्हिडिओ जालना परिसरात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी सर्वात आधी एबीपी माझाने हा प्रकार उघड केल्यानंतर आता प्रशासनाकडून कारवाईला वेग आला आहे.
जालन्यात प्रेमी युगुलाला मारहाण करुन तरुणीचा विनयभंग, पाच आरोपी ताब्यातमहाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना
एबीपी माझाच्या या बातमीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या संसदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी 'ही घटना महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. सगळ्यांना विनंती हा व्हिडीओ फॉरवर्ड करू नका', असे आवाहन त्यांनी सुप्रिया सुळे यांनी केले होते. तसेच ज्यांनी हे कृत्य केलं त्यांच्यावर आणि व्हिडीओ काढणाऱ्यांवर कारवाई करण्याची गृह खात्याला विनंती त्यांनी केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement