Horoscope Today 26 February 2026: आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्यशाली! दत्तगुरूंच्या कृपेने समस्यांचा लवकरच अंत, आजचे राशीभविष्य वाचा...
Horoscope Today 26 February 2026: आज गुरूवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 26 February 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 26 फेब्रुवारी 2026, आजचा वार गुरूवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज समस्या या काही वेळेस संधीही असू शकतात हे लक्षात ठेवा, तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि स्वप्न यांना जिद्दीचे पंख द्या
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज महिला लहरी बनतील, हाता तोंडाशी आलेल्या कामांमध्ये यश मिळाले तरी, त्याचे समाधान मात्र न मिळाल्यामुळे मानसिक त्रास संभवतो
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज मित्र मंडळींचे सहकार्य मिळेल, मोठ्या भावांशी थोडे मतभेद होऊ शकतात
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज प्रत्येकाकडे काही चांगले गुण असतात, हे हेरून गुणग्राहकता ठेवली, तर तुमच्या फायद्याचे आहे
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज समज-गैरसमज यांच्या गाठी सोडून टाकल्या, तर मानसिक समाधान मिळेल, निसर्गाच्या सानिध्यात गेलात तर एकदम फ्रेश होऊन जाल.
कन्या रास (Virgo Horocsope Today)
कन्या राशींच्या लोकांसाठी आज उपासकांना अध्यात्माचा मार्ग स्पष्ट दिसेल, त्यासाठी ते प्रयत्न करतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांना आपल्या कर्तव्याला स्मरून प्रथम अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे, महिलांनी दिलेल्या शब्दाला जागावे
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज सत्य जसे आहे तसेच पुढे येते, त्यामुळे कोणत्याही मोहपाशात न अडकता ईश्वराला स्मरून काम करा
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज व्यवसायात इतरांशी स्पर्धा करण्यामध्ये सरशी राहील, पुढे मिळणाऱ्या पैशाची बीजे आज रोवली जातील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज कुटुंबात मंगल कार्यात हजेरी लावावी लागेल, विद्यार्थ्यांना पूर्वीच्या अभ्यास पद्धतीत बदल करावासा वाटेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज नवीन बदलाला सामोरे जाताना थोडा वेळ अवश्य जाईल, परंतु प्रयत्न मात्र सोडू नका.
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज नवीन नोकरी शोधायची आहे, त्यांनी अवश्य विचार करायला हरकत नाही, वाहने जपून चालवावीत
हेही वाचा,
March 2026 Monthly Horoscope: सज्ज व्हा! मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींचा मार्च महिना गेम पालटणार! कसा जाणार महिना? पैसा, नोकरी, प्रेम...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















