(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gurupaurnima 2023 : गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षी व्यास मंदिराला 31 क्विंटल केळीची अन् 11 क्विंटल आंब्यांची आरास
Maharshi Vyas Mandir : जळगावातील (Jalgoan) यावल शहरातील महर्षी व्यास मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
Jalgaon Gurupaurnima : गुरूंचे गुरू म्हणून महर्षी व्यास मुनी (Maharshi Vyas Muni) यांना मानलं जात. आज गुरूपौर्णिमेनिमित्त देशातील एकमेव असलेल्या जळगावातील (Jalgoan) यावल शहरातील महर्षी व्यास मंदिरात लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी महर्षी व्यास मुनी यांना तब्बल 31 क्विंटल केळीची आणि 11 क्विंटल आंब्यांची करण्यात आरास करण्यात आली होती. मूर्ती आणि मंदिराच्या गाभाऱ्याच्या समोरील बाजूस करण्यात आलेली केळीची आरास लक्षवेधी ठरली आहे.
महर्षी व्यास यांचे संपूर्ण भारतात केवळ तीन मंदिरे आहेत. पहिले बद्रिकारण्यातील व्यासचट्टी, दुसरे बनारसमधील रामनगर तर तिसरे मंदिर जळगाव जिल्ह्यातील यावल येथे आहे. यावल येथील व्यास मंदिराला तब्बल साडेपाच हजार वर्षांचा इतिहास असल्याची आख्यायिका आहे. सातपुडा पर्वत रांगेतील तापी नदीच्या खोर्यात असलेले यावल (Yaval) शहर महाभारताचे रचयिता श्री महर्षी व्यास यांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. महर्षी व्यासांनी यावलला काही काळ वास्तव्य केल्याचे आणि महाभारताचे काही पर्व येथे लिहिल्याची आख्यायिका सांगितली जाते.
यावल येथील व्यास मंदिराला साडेपाच हजार वर्षांचा इतिहास आहे. वेदांमध्ये या मंदिराचा उल्लेख आपल्या पहायला मिळतो. चिरंजीवी व्यास आजही या भूमीत वावरत असल्याची परिसरातील नागरिकांची भावना आहे. तसेच याठिकाणी सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात, अशीही धारणा नागरिकांमध्ये असल्याने याठिकाणी दर्शनासाठी केवळ जळगाव जिल्हा नाहीतर संपूर्ण राज्यातून भाविक दर्शनासाठी यावल शहरातील महर्षी व्यास मुनी या मंदिरावर येतात. सुमारे साडेपाच हजार वर्षांचा इतिहास असलेल्या यावल येथील श्री व्यास मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. आज गुरु पौर्णिमा असल्यामुळे सकाळपासून याठिकाणी भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
भाविकांची दर्शनासाठी गर्दी
सालाबादप्रमाणे यावर्षीही या मंदिरावर आज गुरुपौर्णिमेनिमित्त लाखोंच्या संख्येने भाविकांनी महर्षी व्यासमुनी यांच्या दर्शनासाठी गर्दी केली. आज सकाळपासून मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी महाअभिषेक आणि दुग्ध अभिषेक करण्यात आला. यंदा महर्षी व्यासमुनींना तब्बल 31 क्विंटल केळी तसेच अकरा क्विंटल आंब्यांची आकर्षक अशी आरास करण्यात आली होती. संपूर्ण भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. दिवसभरात भाविकांना पुलाव तसेच बुंदी या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.