एक्स्प्लोर
Shirdi Guru Poornima : गुरुपौर्णिमा निमित्त शिर्डीच्या साईनगरीत भक्तांची मांदियाळी
गुरुपौर्णिमा निमित्त साईबाबांना गुरु स्वरुप मानत हजारो साईभक्त गुरुचरणी नतमस्तक होत आहेत.
Shirdi Sai Baba
1/9

शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
2/9

साईबाबांना गुरु स्वरुप मानत हजारो साईभक्त गुरुचरणी नतमस्तक होत आहेत.
3/9

गुरुपौर्णिमेच्या आजच्या मुख्य दिवशी काकड आरतीनंतर अखंड पारायण समाप्ती झाली.
4/9

यावेळी श्रींची प्रतिमा, पोथी आणि विणाची मिरवणूक काढण्यात आली.
5/9

या मिरवणुकीत संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी वीणा व मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर (भा.प्र.से.) व वैद्यकिय संचालक ले.कर्नल डॉ.शैलेश ओक यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला.
6/9

साई समाधी मंदिरासह भाविक गुरुस्थान मंदिरातही दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं.
7/9

साईबाबा बालफकिराच्या रुपात ज्या निमवृक्षाखाली प्रकटले त्या जागेला गुरुस्थान म्हणून ओळखले जाते. साईबाबा याच निमवृक्षाखाली ध्यान धारणा करत असत.
8/9

गुरुस्थानजवळील निमवृक्षाला प्रदक्षिणा घालून भाविक गुरुला नमन करत असून साईनामाच्या जयघोषाने परिसर दुमदूमून गेला आहे.
9/9

आज सकाळपासून भक्तांनी साईबाबांच्या दर्शनाला गर्दी केली असून साई मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
Published at : 03 Jul 2023 11:26 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
टीव्ही-नाटक
करमणूक
महाराष्ट्र


















