एक्स्प्लोर

Sharad Pawar : शरद पवार मोठा डाव टाकण्याच्या तयारीत, संकटमोचक गिरीश महाजनांविरोधात भाजपच्या मात्तबर नेत्याला तिकीट?

Girish Mahajan : भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांच्या विरोधात शरद पवार एका मात्तबर नेत्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची माहिती मिळत आहे.  

जळगाव : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election 2024) वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे भाजपला एकामागे एक धक्के देत आहेत. आता शरद पवारांनी आपला मोर्चा जळगावकडे (Jalgaon) वळवला असून भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या विरोधात शरद पवार एका मात्तबर नेत्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची माहिती मिळत आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेला शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. या यात्रेदरम्यान भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्या विरोधात जामनेर विधानसभा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे.  दिलीप खोडपे यांची जळगाव जिल्ह्यात मराठा नेता म्हणून ओळख आहे. एकट्या जामनेर मतदारसंघात मराठा समाजाची तब्बल 1 लाख 40 हजार मतदान आहे. त्यामुळे दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्या समोर तगडे आव्हान देण्याची शक्यता आहे.  

गिरीश महाजनांना भाजपमधूनच आव्हान?

मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणुकीत आपण राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उभे राहण्याची तयारी करत असल्याचं दिलीप खोडपे यांनी सांगितलं आहे आहे. गेल्या 35 वर्षापासून आपण भाजपचे काम करत आहे. गेल्या दहा वर्षापासून भाजपमध्ये आपली घुसमट होत आहे. त्यामुळे आपण भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत, असे माहिती दिलीप खोडपे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. 

भाजपचा ज्येष्ठ कार्यकर्ता शरद पवारांच्या गळाला?

तर, राष्ट्रवादी शरद पवार गटात सहभागी होऊन जामनेर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत आपली याबाबत प्राथमिक बोलणी झाल्याने आपण तयारी सुरू केल्याचंही खोडपे यांनी म्हटले आहे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्याच जामनेर मतदारसंघात आव्हान निर्माण झाले आहे. भाजपचा ज्येष्ठ कार्यकर्त्याला गळाला लावण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाने यश मिळविले असल्याचे बोलले जात आहे. दिलीप खोडपे यांच्याकडे सध्या भाजपचे कोणतेही प्रमुख पद नसले तरी एकेकाळी मंत्री गिरीश महाजन यांच्या विजयासाठी धडपड करणारे खोडपे आज त्यांच्याच विरोधात उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. 

आणखी वाचा 

Girish Mahajan: भाजपचे संकटमोचक गिरीश महाजनांनी पळ काढल्याचा व्हिडिओ व्हायरल! स्पष्टीकरण देताना म्हणाले, 'गावात पाऊस झाल्याने...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Shivsena : शिवसेना भाजप राष्ट्रवादी युती होऊ द्या असं राज ठाकरे म्हणाले होते - शिंदेJayant Patil on BJP : अजित पवारांना फाईल दाखवून 10 वर्ष ब्लॅकमेल केलं - जयंच पाटीलABP Majha Headlines :  5 PM :  2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar : महायुतीचे अधिक आमदार निवडून आणायचे आहेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Sharad Pawar : 'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
Hrithik Roshan-Saba Azad : कधी हातात हात, तर कधी घट्ट मिठी; 'लेडी लव्ह' सबा आझादच्या वाढदिवसानिमित्त ह्रतिक रोशनने शेअर केले खास फोटो
कधी हातात हात, तर कधी घट्ट मिठी; 'लेडी लव्ह' सबा आझादच्या वाढदिवसानिमित्त ह्रतिक रोशनने शेअर केले खास फोटो
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
Embed widget