jayant Patil : नाथाभाऊ नेमके कोणासोबत? एकनाथ खडसेंबाबत प्रश्न विचारताच जयंत पाटलांचं अजब उत्तर; म्हणाले...
Jayant Patil on Eknath Khadse : भाजपच्या पक्ष प्रवेशावर आता फुली मारली असून आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातच राहणार, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले होते.
जळगाव : भाजपच्या अतिवरिष्ठ नेत्यांनी मला पक्षात पुन्हा प्रवेश करण्याविषयी विचारले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J P Nadda) यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेशही झाला होता. मात्र, यानंतर भाजपने (BJP) त्याबाबत घोषणा केलीच नाही. आता भाजपच्या पक्ष प्रवेशावर आता फुली मारल्याचे वक्तव्य ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माझा कट्ट्यावर केले होते. आपण पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. आता जळगाव दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना एकनाथ खडसेंबाबत प्रश्न विचारताच अजब उत्तर दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
आज जळगावमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत चाळीसगाव, जामनेर आणि बोदवड येथे जाहीर सभा होणार आहे. जामनेर आणि बोदवड येथील सभेला एकनाथ खडसे उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. जामनेर आणि बोदवाड परिसरात खडसे यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे बॅनर लागल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.
नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
एकनाथ खडसे हे शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होणार किंवा नाही? याबाबत आपल्याजवळ माहिती नाही. मात्र ते सहभागी होणार असतील तर त्यांचं स्वागतच आहे, असेही ते तिकडे गेलेलेच नव्हते. ते यात्रेत सहभागी झाले तर चर्चा होईलच, असे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. यामुळे एकनाथ खडसे यांच्याबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे.
दिलीप खोडपेंच्या प्रवेशाबाबत बोलणे टाळले
दरम्यान, एकनाथ खडसे हे जामनेर आणि बोदवड येथे होणाऱ्या सभेला आपण हजर राहणार असल्याची शक्यतां आहे. त्यांच्या या भूमिकेवर जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. तर भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप खोडपे हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश असल्याबाबत जयंत पाटील यांनी बोलणे टाळले आहे.
अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यात खडसेंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबाबत गणेशोत्सवानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण दिले होते. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे 25 सप्टेंबर रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. ते उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेणार आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्यात एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा