Jalgaon Crime : क्रूरतेचा कळस, कुत्र्याचा जीव घेण्यासाठी कारला बांधून फरफटत नेलं, जळगाव जिल्ह्यातील अमानुष प्रकार
Jalgaon Crime : कुत्र्याचा जीव घेण्यासाठी कारला बांधून फरफटत नेल्याची घटना समोर आलीये. जळगाव शहरात हा अमानुष प्रकार घडलाय.

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात एका कुत्र्याचा जीव घेण्यासाठी अमानुष प्रकार करण्यात आलाय. श्वानाला मारुन टाकण्यासाठी कार बांधून फरफटत नेल्याचा प्रकार जळगावमध्ये उघडकीस आलाय. हा क्रूर प्रकार जळगाव शहरातील सीसीटीव्हीत कैद झालाय. याप्रकरणी जळगाव शहरातील रामानंद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, श्वानाला क्रूरपणे संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्राणी मित्र संघटनांकडून करण्यात आलीये.
कुत्र्याचा जीव घेण्यासाठी कारला बांधून फरफटत नेलं pic.twitter.com/fe7XoXfieF
— Sumit Bhujbal (@SumitBhujb19648) February 9, 2025
रामानंद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल
अधिकची माहिती अशी की, कुत्र्याला दोरीच्या साहाय्याने कारला बांधून त्याला फरफटत नेत ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना जळगाव शहरात घडलीये. ही घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत. या घटनेबाबत जळगाव शहरातील रामानंद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कुत्र्यांचा क्रूर पणाने छळ करणाऱ्या व्यक्तीला कठोरात कठोर शासन करण्यात यावे, अशी मागणी प्राणी मित्र संघटनाकडून केली जात आहे.
कारमधील व्यक्तीने कुत्र्याला मरणासन्न अवस्थेत फेकून दिलं
जळगाव शहरातील प्राणीमित्र संघटनेचे पदाधिकारी ॲड केदार भुसारी हे शहरातून जात असताना त्यांना खंडेराव नगर परिसरात एका कुत्र्याला कारला दोरीच्या साह्याने बांधून फरफटत नेले जात असल्याचं पाहायला मिळाले. कारमधील व्यक्तीने कुत्र्याला मरणासन्न अवस्थेत फेकून दिल्यानंतर भुसारी यांनी त्यांच्या संरक्षणम नावाच्या संस्थेत पशू वैद्यकीय तज्ञांच्या माध्यमातून कुत्र्यावर उपचार सुरू केले आहेत. मात्र सदर घटना ही प्राण्यांचा छळ करण्याचा प्रकार असल्याने भुसारी यांनी या घटनेबाबत शहरातील रामानंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत संशयित आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. प्राणी मित्रांनी मात्र या घटनेचा तीव्र निषेध करत,या घटनेतील जबाबदार व्यक्तीस कठोर कारवाईची मागणी केली आहे.
कुत्र्याचा जीव घेण्यासाठी कारला बांधून फरफटत नेलं pic.twitter.com/fe7XoXfieF
— Sumit Bhujbal (@SumitBhujb19648) February 9, 2025
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
