एक्स्प्लोर

Wrestlers Protest: "आमची तेवढीही लायकी नाही?"; क्रिकेटर्सचा सपोर्ट न मिळाल्यामुळे विनेश फोगाट भावूक

Wrestlers Protest Update: अनेक राजकीय नेत्यांनी, कलाकारांनी आंदोलक कुस्तीपटूंची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला. मात्र, दरम्यान इतर खेळाडूंची साथ न मिळाल्यानं कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे.

Wrestlers Protest Update: रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी देशातील दिग्गज कुस्तीपटूंनी दिल्लीत आंदोलन पुकारलं आहे. त्यांना अनेक राजकीय पक्षांकडूनही पाठिंबा मिळत आहे, मात्र आतापर्यंत त्यांच्या समर्थनार्थ दुसरा कोणीही खेळाडू पुढे आलेला नाही. क्रिकेटपटूंनीही कुस्तीपटूंच्या आंदोलनाला कोणताही पाठिंबा दिलेला नाही. याचसंदर्भात आता कुस्तीपटू विनेश फोगाटनं (Vinesh Phogat)  प्रश्न उपस्थित केला आहे. विनेशनं भारतीय क्रिकेटपटू आणि इतर आघाडीच्या खेळाडूंच्या मौनावर प्रश्न उपस्थित केला आहे. विनेश फोगाट म्हणाली की, "संपूर्ण देश क्रिकेटची पूजा करतो, पण एकही क्रिकेटपटू काहीच बोलला नाही."

'ब्लॅक लाइव्ह्स मॅटर' चळवळीचे उदाहरण देत विनेश म्हणाली की, आपल्या देशात महान खेळाडू नाहीत असं नाही. असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी अमेरिकेतील ब्लॅक लाइव्ह्स मॅटर चळवळीला पाठिंबा दर्शवला होता. आमची एवढीही लायकी नाही का? पुढे बोलताना ती म्हणाली की, जेव्हा कुस्तीपटू जिंकतात, तेव्हा सर्व क्रिकेटपटू त्यांचं अभिनंदन करण्यासाठी येतात. त्यांच्यासाठी ट्वीटही करतात, मग आता काय झालं? फोगटनं पुढे बोलताना विचारलं की, या खेळाडूंना व्यवस्थेची इतकी भीती वाटते की हो, काही तरी गडबड सुरू आहे?

पीटी उषा (PT USHA) यांच्यासंदर्भात काय म्हणाली विनेश फोगट?

याशिवाय विनेशनं पीटी उषा यांचं वक्तव्य असंवेदनशील असल्याचं म्हटलं आहे. आपण संविधानानुसार जगतो आणि स्वतंत्र नागरिक आहोत, असं विनेश म्हणाली. आपण कुठेही जाऊ शकतो, आम्ही बाहेर रस्त्यावर बसलो आहोत तर काहीतरी कारण असेलंच ना? आमचं कोणी ऐकलं नाही, यामागेही काहीतरी कारण असावं, मग ते आयओए असो वा क्रीडा मंत्रालय. फोगट म्हणाली की, तिनं पीटी उषा यांना फोनही केला होता, पण त्यांनी फोनही उचलला नाही.

काय म्हणाल्या होत्या पीटी उषा?

पीटी उषा म्हणाल्या होत्या की, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) कडे लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी एक समिती आहे. रस्त्यावर उतरण्याऐवजी ते (आंदोलक पैलवान/कुस्तीपटू) आधी आमच्याकडे येऊ शकले असते, पण ते आयओएमध्ये आलेच नाहीत. केवळ कुस्तीपटूंसाठीच नाही तर खेळासाठीही ते चांगलं नाही. त्यांनी थोडी शिस्तही बाळगली पाहिजे. पैलवानांच्या निषेधामुळे देशाची प्रतिमा मलीन होत असल्याचंही पीटी उषा बोलताना म्हणाल्या होत्या. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Kapil Sibal : 'न्यायाचे सैनिक तुमच्यासोबत', कुस्तीपटूंच्या आंदोलनाला कपिल सिब्बलांचं समर्थन 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget