एक्स्प्लोर
खा. रवींद्र गायकवाड अधिवेशनाला हजेरी लावणार?
नवी दिल्ली : मागील दोन दिवसांपासून कोणाच्याही संपर्कात नसलेले शिवसेनेचे चप्पलमार खासदार रवींद्र गायकवाड संसदेच्या अधिवेशनात तरी हजेरी लावतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
रवींद्र गायकवाड उमरग्यात पोहोचलेलेत नाहीत, त्यामुळे ते सध्या कुठे आहे, हे समजू शकलेलं नाही.
दरम्यान रवींद्र गायकवाड यांना विमान प्रवास नाकारणाऱ्या कंपन्यांविरोधात शिवसेनेचे खासदार आज हक्कभंग आणण्याची शक्यता आहे. कायद्यानुसार अशाप्रकार कोणत्याही प्रवाशाला तिकीट नाकारता येत नाही, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळे चप्पलमार खासदाराच्या पाठीशी शिवसेना उभी राहिल्याचं चित्र आहे.
देशातील प्रमुख विमान कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांना ब्लॅक लिस्ट केल्यानंतर ते ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेसने मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. परंतु ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेसमधून एकाएकी गायब झालेले रवींद्र गायकवाड अद्याप उस्मानाबादला परतलेले नाहीत.
काय आहे प्रकरण?
उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड हे पुण्याहून दिल्लीला जात होते. बिझनेस क्लासचं तिकीट असताना आपल्याला इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं, असा दावा गायकवाड यांनी केला. रवींद्र गायकवाड त्याची तक्रार दिल्लीत गेल्यावर करणार होते. दिल्लीत विमान पोहोचल्यानंतर त्यांनी तक्रार पुस्तिका मागवली, पण एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी नकार दिला, असा दावा गायकवाड यांनी केला.
VIDEO: खा. रवींद्र गायकवाडांची गुंडगिरी विमानातल्या कॅमेऱ्यात कैद
विमानातून सर्व कर्मचारी उतरुन गेल्यानंतरही रवींद्र गायकवाड बसून राहिले. तक्रार करण्याचा त्यांचा हट्ट होता. त्यानतंर क्रू मेंबरने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला बोलावलं. मात्र त्या कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा केली, असं रवींद्र गायकवाड यांचं म्हणणं आहे.
… म्हणून मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला 25 सँडल मारले : रवींद्र गायकवाड
‘मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही, मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो, अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले’’, अशी कबुली रवींद्र गायकवाड यांनी दिली.
गायकवाड यांची गुंडगिरी कॅमेऱ्यात कैद
शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांची गुंडगिरी विमानातल्या कॅमेऱ्यात कैद झाली. पुण्याहून दिल्लीला परतताना रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या विमानात अधिकाऱ्याला मारहाण केली. या घटनेनंतर एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यांनी रवी गायकवाड यांची चांगलीच कानउघडणी केली.
कोण आहेत रवींद्र गायकवाड?
– रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत
– लोकसभा निवडणुकीत रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला.
– उस्मानाबाद आणि परिसरात रवी सर म्हणून ते परिचित आहेत
– रवींद्र गायकवाड हे उमरगा मतदारसंघातून दोन वेळ विधानसभेवर निवडून गेले होते.
– दुष्काळी भागात पाझर तलावासाठी त्यांनी काम केलं आहे.
– तसंच उस्मानाबाद परिसरातील वीजेच्या प्रश्नासाठीही आवाज उठवला.
संबंधित बातम्या
चप्पलमार खासदार रवींद्र गायकवाडांवर 'अमूल'चा चित्रातून निशाणा
गायकवाडांना सेवा नाकारणाऱ्या एअरलाईन्सविरोधात हक्कभंग आणणार
लोकप्रतिनिधींनी पटकन हिंसक होणं अयोग्य : एकनाथ शिंदे
पुन्हा त्याच विमानाने जाणार, एअर इंडियाने अडवून दाखवावं : गायकवाड
एअर इंडियाकडून खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात तक्रार
… म्हणून मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला 25 सँडल मारले : रवींद्र गायकवाड
शिवसेनेने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याचा पुतळा जाळला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement